Ashok Chavhan On Resign: '....फक्त दोन दिवस थांबा', काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

Ashol Chavhan On Resign: काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Ashok Chavhan On Resign
Ashok Chavhan On ResignEsakal
Updated on

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण, विश्वजीत कदम पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागलीय. त्याचसोबतच ५-६ आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी म्हटलं की, 'मी आज माझा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझा कोणावरही राग नाही, काँग्रेसमध्ये मी आत्तापर्यंत प्रमाणिकणे काम केलं. मी माझा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करेन. फक्त दोन दिवस थांबा असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

मी माझी राजकीय भूमिका दोन दिवसात जाहीर करेन. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

अनेक वर्ष प्रमाणिकपणे काम केलं आता नवीन पर्याय शोधत आहे. पक्षाने माझ्यासाठी खूप केलं मी देखील पक्षासाठी खूप केलं असं त्यांनी म्हटलं आहे.

Ashok Chavhan On Resign
Vishwajeet Kadam: विश्वजीत कदमसुद्धा काँग्रेस सोडणार? अशोक चव्हाणांसोबत ११ आमदार! BJP ऐवजी अजित पवारांच्या पक्षाचा ऑप्शन खुला

काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण?

प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असे काही नाही. मी जन्मपासून आतापर्यंत काँग्रेसचे काम केले. आता मला वाटतं मला आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. म्हणून मी पक्षाचा राजीनामा दिला.

Ashok Chavhan On Resign
Ashok Chavan Resignation: अशोक चव्हाणांनी एक्सवर पोस्ट करत राजीनाम्याची दिली माहिती; प्रोफाईल फोटो-कव्हर फोटो बदलला

सोबत किती आमदार?

पक्षाचा राजीनामा देणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी कोणत्याही आमदारांशी, सहकार्यांशी चर्चा केली नाही. मी माझा निर्णय येत्या एक दोन दिवसात ठरवेन, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Ashok Chavhan On Resign
Devendra Fadanvis on Ashok Chavan: अशोक चव्हाणांसोबत अनेक नेते भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आगे आगे देखो..'

'मला कुठलीही पक्षांतर्गत जाहीर वाच्यता करायची नाही. कुणाचाही उणीदुणी काढायची नाही. मी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम केलं आहे. आता वेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवा. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मी उद्याप इतर कुठल्याही पक्षात सामिल होण्याचा निर्णय घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीचं कारण सांगितलं जाऊ शकत नाही. मी काल संध्याकाळपर्यंत पक्षाच्या बैठकीत सहभागी होतो. मी कुठल्याही आमदाराशी चर्चा केलेली नाही. माझ्या राजीनाम्याचा आणि कुठल्याही श्वेतपत्रिकेचा काहीही संबंध नाही. माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मी माझी कुठलीही मागणी कुठल्याही पक्षासमोर ठेवलेली नाही किंवा चर्चाही केलेली नाही. मी स्वतः वेळ घेऊन मग निर्णय घेणार आहे', असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

का आहेत नाराज?

जागा वाटपाबाबत जेवढ्या गतीनं काम करायलं हवं तेवढ्या वेगानं ते होत नाहीए, हे मला देखील जाणवत आहे. मला बोलण्याचा अधिकार नाही पण जर जागा वाटपाबाबत योग्य वेळी निर्णय झाला असता तर त्याचा फायदा निश्चित महाविकास आघाडीला होऊ शकला असता..

Ashok Chavhan On Resign
Ashok Chavan: राजीनामापत्रात काय लिहिलंय ? पेनाने लिहिलेल्या एका शब्दामुळे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबद्दल झालं स्पष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.