राज्यभरातील ASMIचे डॉक्टर आंदोलनाच्या पावित्र्यात

आई-वडिलांनी कर्ज काढून राहुलवरील उपचारासाठी आठ लाख रुपये खर्च केले. पुढील खर्चाच्या मदतीसाठी राहुलच्या मित्रांनी तसेच गावकऱ्यांनी चळवळ उभारत दोन लाखांपेक्षा अधिक मदत निधी जमा केला होता.
Doctors
DoctorsSakal
Updated on
Summary

आई-वडिलांनी कर्ज काढून राहुलवरील उपचारासाठी आठ लाख रुपये खर्च केले. पुढील खर्चाच्या मदतीसाठी राहुलच्या मित्रांनी तसेच गावकऱ्यांनी चळवळ उभारत दोन लाखांपेक्षा अधिक मदत निधी जमा केला होता.

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis) वाढत चाललेला प्रादुर्भाव आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढवत आहे. गेल्या वर्षभरापासून रात्रं-दिवस रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी आता आंदोलनाचा (Agitation) पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील डॉक्टर विविध मागण्यांबाबत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते, पण शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने त्यांनी आता आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. डॉक्टरांची संघटना असलेल्या ASMI ने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात राज्यभरातील ७५०० शिकाऊ एमबीबीएस डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार आहेत. (ASMI association of doctors has warned of agitation)

'फ्रंटलाइन वर्कर’ मध्ये समावेश होणारा एक तरुण डॉक्टर महिनाभरापासून औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत होता, मात्र बुधवारी (ता.२६) त्याची प्राणज्योत मालवली. त्याला म्युकरमायकोसिसचा संसर्गही झाला होता. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याला मदतीची गरज असल्याचे वृत्त ‘ई-सकाळ’वर प्रसिद्ध करण्यात आले होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याची दखल घेत सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले होते.

Doctors
लॉकडाउन १५ जूनपर्यंत कायम; पण 'या' ठिकाणी होणार निर्बंध शिथिल

राहुल पवार असे या डॉक्टरचे नाव होते. तो मूळचा परभणी जिल्ह्यातील लिंबा (ता.सोनपेठ) येथील रहिवासी होता. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून तो लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करत होता. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. घरची आर्थिक स्थिती नाजूक होती. राहुलला काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाची लागण झाली होती. राहुलच्या मृत्युनंतर त्याला शासकीय मदत मिळणे अपेक्षित आहे, पण शासनाने हा निर्णय मागे घेतल्याने डॉक्टरांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे.

Doctors
राजधानी दिल्ली : एक पाऊल मुस्कटदाबीच्या दिशेनं!

आई-वडिलांनी कर्ज काढून राहुलवरील उपचारासाठी आठ लाख रुपये खर्च केले. पुढील खर्चाच्या मदतीसाठी राहुलच्या मित्रांनी तसेच गावकऱ्यांनी चळवळ उभारत दोन लाखांपेक्षा अधिक मदत निधी जमा केला होता. काही रक्कम एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातर्फे देण्यात येणार होती. तर ‘एमजीएम’ही मदत करीत होते. पण हे सर्व प्रयत्न तोकडे पडले. शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने विविध रुग्णालयातील सर्व डॉक्टर आजचा दिवस हा 'काळा दिवस' म्हणून पाळणार आहेत.

राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.