Ambadas Danve: 10 वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक, पण...; नाराजींच्या चर्चावर अंबादास दानवे काय म्हणाले?

UBT Ambadas Danve News: उबाठा गटाचे नेते आणि विधान परिषदचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ambadas Danve
Ambadas Danveesakal
Updated on

Ambadas Danve- उबाठा गटाचे नेते आणि विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी नाराज नाही. आग्रही नाही. पण, लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे. याबाबत पक्ष नेतृत्त्व काय ते निर्णय घेतील, असं ते म्हणाले. ( UBT Leader Ambadas Danve say about loksabha election 2024)

मी पक्ष सोडण्याच्या ज्या काही चर्चा सुरु आहेत. त्याला काही अर्थ नाही. तिकीट मिळणं न मिळणं, यापेक्षा संघटनेच्या विचारांना मानणारा मी शिवसैनिक आहे. संघटनेच्या प्रमुखांकडे हट्ट करण्याचा, आग्रह धरण्याचा माझा अधिकार आहे. त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण, त्यांनी जे आदेश देतील त्याचं पालन करण्यास आम्ही बांधील आहोत, असं दानवे म्हणाले.

मोठी जबाबदारी माझ्याकडे असताना मी नाराज होणे किंवा इकडेतिकडे जाणं या बातम्यांबाबत काहीही तथ्य नाही. मी गेल्या १० वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. हे पक्ष प्रमुखांना देखील माहिती आहे. मी माझी इच्छा लपवून ठेवलेली नाही. प्रमुखांनी अजून निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे जुना चेहरा किंवा नवा चेहरा देण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. मी इच्छा व्यक्त केली आहे, असं ते म्हणाले.

Ambadas Danve
Nashik Kalyan Local : नाशिक-कल्याण लोकलची ट्रायल घ्या : केंद्रीय राज्यमंत्री दानवे

मला जायचं असेल तर मी तेव्हाच गेलो असतो. मी शिंदे गटात नाही, शिंदे गट पाच ते सहा महिने राहणार आहे. इच्छा व्यक्त करणे आपला अधिकार आहे. काही गोष्टी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्या आहेत. दुसरी बाजू मांडणं गरजेचं होतं. चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलण्याचा प्रयत्न करतात. पण, मी उद्धव ठाकरेंसाठी काम करतो. त्यामुळे खैरे काय करतात याबाबत मला देणंघेणं नाही, असं दानवे म्हणाले.

Ambadas Danve
विमानतळाच्या नामांतराची फाईल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही; अंबादास दानवे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊ शकत नाही. खैरेंना उमेदवारी दिली तरी त्यांच्यासाठी नाही पण शिवसेना पक्षासाठी काम करेन. एकाकीपणाने कोणी काम करत असेल तर ते नेतृत्त्वाला कळवायला हवं होतं. ते कळवलं आहे. खैरेंच्या आरोपात काही तथ्य नसतं. पक्षात स्पर्धा तर असतेच. हा वाद नाही. शिंदेच्या गटात कधीच जाणार नाही, असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.