पुणे - आलिशान वाहने घेऊन उमेदवार प्रचारात उतरल्यास निवडणूक आयोग नोंद घेत असलेल्या खर्चात चांगलीच वाढ होणार आहे. कारण मर्सिडीजचे २८ हजार रुपये, लँड क्रूझर २३ हजार ५०० रुपये, व्हॅनिटी व्हॅनला २५ हजार रुपये प्रचारासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. सोफा सेटला प्रतिदिन तीनशे तर व्हीआयपी सोफा सेटला प्रतिदिन बारा हजार रुपये मोजावे लागणार आहेत.