Mahavikas Aghadi : ‘मविआ’चा घोळ कायम; तुर्त ‘८५’ च्या फॉर्म्युल्यावर एकमत; अन्य ३३ जागांवर चर्चा

महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावावरून सुरू असलेल्या वादावर अखेरीस समान हिस्सेदारीचा मार्ग काढण्यात आला आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadisakal
Updated on

मुंबई - महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावावरून सुरू असलेल्या वादावर अखेरीस समान हिस्सेदारीचा मार्ग काढण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी ८५ जागांवर निवडणूक लढविण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले असून २५५ जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित ३३ जागांवर चर्चा सुरू असून त्यापैकी मित्रपक्षांना १८ जागा देण्याची घोषणाही पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.