कोल्हापूर- सांगली - राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना आज ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा पावसाने गाजविल्या. साताऱ्याच्या झेडपी मैदानावर २०१९ मध्ये भर पावसात लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीरसभेत पवारांनी ‘मी केलेली चूक सातारकरांनी दुरुस्त करावी’ अशी साद घालत जनतेलाच भाकरी फिरविण्याचे आवाहन केले होते.