पुणे - राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २०) मतदान होत असताना, सोमवारी (ता. १८) आणि मंगळवारी (ता. १९) शाळांना सरसकट सुटी नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिले..निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना पुढील आठवड्यात सोमवारी ते बुधवार दरम्यान सुटी जाहीर करण्याचा निर्णय आवश्यकतेनुसार त्या-त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी घ्यावा, असा आदेश देणारे परिपत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी काढले होते. परंतु, त्यानंतर शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे अखेर शिक्षण आयुक्तांना याबाबत स्पष्टीकरण करणारे परिपत्रक शुक्रवारी काढावे लागले..शिक्षण विभागाने गुरुवारी परिपत्रक काढल्याने शाळांना सोमवारी (ता. १८) आणि मंगळवारी (ता. १९) सुटी जाहीर करण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. परंतु, ही कोणतीही सार्वत्रिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही. या संदर्भात गुरुवारी दिलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे..केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही, अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिली आहे..अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील. केवळ वरील परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापकांनी सुट्टी द्यावी, अशा सूचना आहेत. ही सरसकट आणि सार्वजनिक सुट्टी नाही, याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यात कोणत्याही शाळा अनावश्यकरीत्या बंद राहणार नाहीत, याचीही सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.