Ajit Pawar on Assembly Election: देशातील चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमधील मतमोजणी रविवारी कऱण्यात आली होती.
यापैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठी आघडी मिळाली आहे. तर तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर देशाला मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असा विश्वासही दर्शवला.
तेलंगणा राज्यात बीआरएस पक्ष पराभवाच्या वाटेवर आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केलय. अजित पवार म्हणाले की, "तेलंगणामधील केसीआर राव हे महाराष्ट्रात फिरले. देशाच्या सर्व टीव्ही चॅनलवर जाहिराती दिल्या. आताच्या निकालावरुन त्यांची परिस्थिती बिकट वाटते. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही भागात भाजपच येईल असं चित्र आहे."
यापुढे अजित पवार म्हणाले की, "आम्ही घेतलेली भूमिका काही लोकांना आवडलेली नाही. कोणी काहीही म्हटलं तरी, नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे." (Latest Marathi News)
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील निवडणुकांची मतमोजणी रविवारी करण्यात आली. यावेळी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्ष आगेकूच करताना दिसत आहे तर तेलंगणामध्ये काँग्रेसला विजय मिळवण्यात यश आलं. मात्र, राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता काँग्रेसला गमवावी लागण्याची शक्यता आहे. Latest Marathi News | Breaking Marathi News | Live News in Marathi | Sakal (esakal.com)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.