Ravi Rana : विधानसभेतही राणा नकोच! अमरावतीतल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध

Navneet Rana : अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणारे स्थानिक भाजपचे पदाधिकारी रवी राणा यांनादेखील विरोध करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत रवी राणा नको, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
Navneet Rana and Ravi Rana
Navneet Rana and Ravi Ranaesakal
Updated on

Assembly Election 2024 : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजपच्या अमरावती येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. याशिवाय बच्चू कडू यांचा विरोध होताच. त्यामुळे नवनीत राणा यांना पराभव पत्करावा लागला. आता रवी राणा यांनादेखील विरोध होत आहे.

अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणारे स्थानिक भाजपचे पदाधिकारी रवी राणा यांनादेखील विरोध करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत रवी राणा नको, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. 'साम टीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

Navneet Rana and Ravi Rana
‘समाजकल्याण’ची भन्नाट योजना! लाभार्थींना मिळेल झेरॉक्स मशिन, सायकल, कडबाकुट्टी, ई-रिक्षा, MS-CITचे प्रशिक्षण आणि बरंच काही..

अमरावती जिल्हा भाजपच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपलाच सोडावा व स्थानिक भाजपला उमेदवारी द्यावी, अशी स्थानिक भाजपची मागणी आहे.

Navneet Rana and Ravi Rana
Ashadhi Ekadashi: वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाची विशेष योजना! पंढरीत येणार 15 लाख वारकरी; 1030 बस थेट वारकऱ्यांच्या गावातून

''भाजपच्या वरिष्ठांशी जवळीक आणि खालच्या भाजप कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा नकोच.'' असा स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोधी सूर आहे. विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांना उमेदवारी देऊ नका, याबाबत भाजपचे पदाधिकारी श्रेष्ठींना बोलणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.