Maharashtra Assembly Elections 2024: ठरलं? लोकसभेसोबतच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार

लोकसभेसोबतच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार असल्याचं रावसाहेब दानवेंचं वक्तव्य
Raosaheb Danve
Raosaheb DanveEsakal
Updated on

हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भ्रष्टाचार, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचं दानवे यांनी म्हंटलं आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यामध्ये नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यावेळी कार्यक्रमात बोलताना दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Raosaheb Danve
Police : भररस्त्यात शिवीगाळ करत पोलिसानं चारचाकीची काच फोडली? चालकाच्या दाव्यानं खळबळ

दरम्यान रावसाहेब दानवे बोलताना म्हणाले की, राज्यातील आताची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा दानवे यांनी यावेळी केलाय. रावसाहेब दानवे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यावधी निवडणूक लागण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Raosaheb Danve
Winter Session: मुख्यमंत्र्यांसह शिंदे गट विरोधकांकडून टार्गेट? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.