राष्ट्रवादी आमदाराचं खाली डोकं वर पाय; राज्यपालांविरोधात केलं शिर्षासन

assembly session 2022 mla sanjay daund done sirshasan protest against bhagat singh koshyari
assembly session 2022 mla sanjay daund done sirshasan protest against bhagat singh koshyari
Updated on

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session 2022) याच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचे अभिभाषण पुर्ण होऊ शकल नाही, ते आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवून निघून गेले.

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजप (BJP) आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली. तर राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी देखील घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी काढता पाय घेतला.

assembly session 2022 mla sanjay daund done sirshasan protest against bhagat singh koshyari
'राज्यपालांनी राष्ट्रगीताचा अपमान करणं अपेक्षित नाही' - जयंत पाटील

या दरम्यान राज्यापालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे बीडचे आमदार संजय दौड (Sanjay Daund) यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच शिर्षासन केलं. राज्यपालांनी राष्ट्रगीताचा आणि राज्याचा अपमान केला आहे, त्यामुळं खाली डोकं वर पाय करून त्यांचा निषेध केल्याचं त्यांनी सांगितलं.

assembly session 2022 mla sanjay daund done sirshasan protest against bhagat singh koshyari
राहुल गांधींच्या प्रश्नावर भाजप म्हणतं, 'राजीव गांधी 1971 च्या युद्धात…'

राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यावरच सोडत सभागृहातून काढता पाय घेतल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यांनंतर राज्यपालांचा निषेध करत आमदार संजय दौंड यांनी खाली डोकं, वर पाय करत शीर्षासन करुन राज्यपालांचा आणि विरोधी पक्षाचा निषेध केला.

assembly session 2022 mla sanjay daund done sirshasan protest against bhagat singh koshyari
युक्रेनमध्ये मुलगा गमावलेले वडील म्हणाले, '९७ टक्के गुण असूनही इथे…'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.