वीज चोरी होत असल्याचं म्हटल्यानं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शेतकऱ्यांना चोर म्हणताय का असं विचारलं. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ सुरु केल्यानं पाच मिनिटांसाठी कामकाज स्थगित कऱण्यात आलं.
केंद्राच्या नावाने ओरड करायचा प्रयत्न केला ही दुर्दैवी गोष्ट आहे असं म्हणत पडळकरांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ते म्हणाले की, बुलढाण्याच्या एका शेतकऱ्यानं २० वर्षापूर्वी अर्ज केला. आजही त्याला कनेक्शन मिळालं नाही. ६ डिसेंबर २०२१ ला त्याला वीजबील दिलंय. शिवाय दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या मोटारी बंद असूनही त्याला भलं मोठं बिल दिलं आहे. जर तुम्ही अशी बोगस बिलं दिली असतील तर तुम्ही खात्याला बिलं दुरुस्त होणार नाही तोपर्यंत वीज कनेक्शन तोडणार नाही याचे आधेश देणार का? तोडलेले कनेकश्न जोडण्याचे आदेश देणार का? बिल दुरुस्तीचे कँप घेणार का? डीपीचा लोड कमी जास्त होतोय ते तुम्ही सुरळीत होणार का? असे प्रश्न पडळकरांनी विचारले.
केंद्राने त्यांना कर्ज उपलब्ध करून देताना काही नियम दिलेत आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे आपल्याला पैसे उपलब्ध होणार नाहीत अशी माहिती राज्याच्या उर्जा राज्यमंत्र्यांनी दिली.
मुद्यावर प्रश्न विचारावेत असं म्हणत उर्जा राज्य मंत्र्यांना मुद्यावर बोलण्यास सांगितलं. यावर नितीन राऊत यांनी उत्तराला वेळ द्यावा अशी मागणी केली. तसंच ते पैशाचे सोंग आणता येत नाही असंही म्हटलं. यावर पैशाचं सोंग आणता येत नसेल तर सरकार सोडून द्या ना असंही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले. तुम्ही वेगवेगळे कर कमी करता, वाईन उत्पादकांना अनुदान देता, पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय . महाराष्ट्राच्या बळीराजाला आधार देण्याची गरज, त्याचे वीज कनेक्शन तोडू नयेत याचे आदेश देणार का? वीजबिलांची दुरुस्ती करणार का असा प्रश्न दरेकरांनी विचारला.
पाच वर्षात १० हजार कोटीचे ४० हजार कोटी थकबाकी झाली तेव्हा आधीच्या सरकारने काहीच मदत महावितरणला केली नाही. केंद्र सरकारने उदय योजना आणली होती. ही वेगवेगळ्या राज्यातील वितरण कंपन्यांवरील आर्थिक भार वाढलेलला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबणाऱ्या कंपन्यांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्राने पाऊल उचललं होतं असंही प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं.
महावितरणने प्रस्ताव सरकारकडे दिला होता. २२ हजार ९७ कोटींचा प्रस्ताव होता. राजस्थानला ७६ हजार १२० कोटी रुपये त्यांच्या सरकारने दिले. उत्तर प्रदेशला जवळपास ५० हजार कोटी रुपये दिले. तर महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने ६ हजार कोटींपर्यंत देऊ असं म्हटलं होतं. अशीही माहिती उर्जा राज्य मंत्र्यांनी दिली.
उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदाभाऊ खोत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, महावितरणची सध्या दमछाक होतेय. महावितरणवर सेवा देताना परवड होतेय, पैशांची चणचण होण्याची वेळ का आली याचा आढावा घ्यायला हवा. २०१४ मध्ये १० हजार कोटी रुपये थकबाकी होती तर सर्व मिळून २० हजार कोटी होती. मार्च २०२० मध्ये शेतीपंपाची थकबाकी ४० हजार कोटी तर एकूण ६० हजार कोटी थकबाकी झाली.
थकबाकी खोटी आणि फुगवून दाखवली आहे, ती थकबाकी तपासून प्रत्यक्षात जितका वापर आहे ते तपासून बिले देणार का, ऑनलाइन-ऑफलाइन केलेलं आहे त्याची चौकशी केलेली नाही, दुप्पट बिलिंग दाखवून दुप्पट अनुदान उचललं आहे त्यामुळे खरं बिल किती आहे ते काढा, दुप्पट बिल काढून अनुदान उचललं असेल तर तुम्ही काय कारवाई करणार? यापुढे असं होणार नाही याची काळजी घेणार का ? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी विचारला.
मोफत वीज देऊ म्हणालात, मोफद देणं बाजुलाच राहिलं पण वाढीव बिलं दिलीत आणि डबल युनिट केल्यानं सरकारचं अनुदानही डबल घेतलं, शेतकरी वीज मंडळाचं देणं लागत नाही, तर वीज मंडळच शेतकऱ्यांचं देणं लागतं - सदाभाऊ खोत
शेतकऱ्याच्या वीज बीलावर १० एचपीचा वापर म्हणून बील दिलं, पण प्रत्यक्षात ३ एचपीचा वापर होता. राज्यात असं मोठ्या प्रमाणावर घडलं असल्याचंही सदाभाऊ खोत म्हणाले.
विधीमंडळाचे अधिवेशन दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत
वीज महामंडळाचा गैरव्यवहार लपवण्यासाठी शेतकरी जास्त वीज वापरत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय - सदाभाऊ खोत
मनिषा साने प्रकरणाची चौकशी मी केली, अकरा वाजेपर्यंत जाण्यास परवानगी नाही, मग दोन वाजेपर्यंत कशी फिरली, फोटो काढला पण दोन पर्यंत तिला परवानगी दिली कशी अशी विचारणा अध्यक्षा निलम गोऱ्हे यांनी केली. यावर उत्तर देताना सतेज पाटील यांनी म्हटलं की, मुलगी फिरत होती तेव्हा पोलिसांनी तिला हटकलं, तिला जाण्यास सांगितलं तेव्हा तिथल्या एका हॉटेलजवळ सीसीटीव्हीचं कव्हरेज कमी आहे, दुर्दैवाने त्याठिकाणी जाऊन मुलगी थांबली होती. जीवरक्षक त्याठिकाणी होता, त्यानं त्याचवेळी पोलिसांना सांगायला हवं होतं, त्याची चौकशी होईल, बेपत्ता मुलगी असून चौकशी सुरु आहे. त्यांची माहिती घेतली जात आहे, तपास बोईसर आणि बांद्रा पोलिस करत आहेत. गरज पडल्यास क्राइम ब्रांचकडे तपास वर्ग करण्यात येईल अशीही माहिती सतेज पाटील यांनी दिली.
लक्षवेधीमध्ये मनिषा कायंदे यांनी बोईसर मनीषा साने बेपत्ता प्रकरणाची माहिती दिली. यावर सतेज पाटील यांनी मिसिंग मनीषा साने प्रकरणाची हिची बांद्रा पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं.
हिवाळी अधिवेशवन : दुसऱ्या दिवसाचे परिषेदेचे कामकाज सुरू
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आज सभागृहात भरती घोटाळा संदर्भात मोठा खुलासा करण्याची शक्यता
लोकलेखा समितीचा अहवाल ही आज मांडला जाणार
विधानसभा अध्यक्ष निवडणूक पद्धत आवाजी मतदानाने करण्याच्या संदर्भात सूचना हरकती नेमक्या काय दिल्या जातात याकडे लक्ष असून सादर केलेल्या पुरवण्या मागणी यावर ही आज चर्चा होइल. आज अनेक विधेयक सभागृहात मांडली जाणार आहेत.