वर्षभरासाठी आमदार निलंबित करणं लोकशाहीला काळीमा - फडणवीस

Assembly Winter Session : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

मुंबई: 22 तारखेपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session) सूरू होणार आहे. यावरून आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर बहीष्कार टाकत असल्याचं सांगितलं आहे. कमी काळाचं अधिवेशन घेऊन लोकशाहीला कुलुपबंद करण्याचा सरकारचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. त्यामुळे आता विधानसभेचं अधिवेशन देखील वादळी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis
सुनेची EDने केलेली चौकशी पचनी पडली नाही, भातखळकरांची जया बच्चनवर टीका

भ्रष्टाचार, बलात्कार आणि वेगवेळ्या घोटाळ्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही कोरोनाच्या मृत्यूच्या आकडेवारीमध्ये झालेले घोटाळे आणि शेतकऱ्यांची वीज कापणे यांसारखे मुद्दे आम्ही विधानसभेत उपस्थित करू असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विरोधकांचे १२ आमदार निलंबित करायचे, घोटाळे करायचे, लोकशाहीच्या विरोधात काम करायचं आणि आम्हाला चहापानाला बालवायचं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या चहापानाच्या कार्यक्रमावर बहीष्कार टाकत असल्याचं सांगितलं आहे. परीक्षा घोटाळ्याचे तरुणाईवर गंभीर पडसाद पडत असून, त्यामुळे त्यांचा व्यवस्थेवरून विश्वास उठत असल्याचंही ते म्हणाले आहेत. परीक्षा घोटाळ्यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अधिवेशनात विरोधकांचा जास्तीत जास्त भर हा चर्चा करण्यावर असेल, सर्व मुद्दे आम्ही अधिवेशनात उपस्थित करू असंही त्यांनी सांगितलं आहे. ओबीसी आरक्षणावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला दोन वर्षांत इम्पिरीकल डेटा का गोळा करता आला नाही? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारनेच ओबीसींचं आरक्षण घालवल्याचा आरोप त्यांनी केला.

Devendra Fadnavis
पुढील 24 तासांत थंडीची लाट; महाराष्ट्रही गारठणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()