खान्देश, विदर्भात उल्कापात? लोकांमध्ये भीती अन् उत्सुकता

रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आकाशात अनेक ठिकाणांहून हे दृश्य दिसलं
Meteor showers
Meteor showers
Updated on

नागपूर : राज्यातील खान्देश आणि विदर्भातील काही भागांमध्ये आकाशात खगोलीय घटना पहायला मिळाली. मोठ्या प्रमाणावर उल्कापाताच्या घटना रात्रीच्या आकाशात दिसून आल्या. यामुळं नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळाली तर काहींमध्ये भीतीचं वातावरणंही होतं. (Astronomical events Meteor showers in Khandesh Vidarbha Curiosity in public)

जळगाव जिल्ह्यातील अमळेर इथं ही खगोलीय घटना दिसून आली. धूमकेतूचे तुकडे किंवा धूळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणमुळे वातावरणात प्रवेश करत असताना घर्षणाने पेट घेतल्याची ही घटना अनेकांना पहायला मिळाली. संबंधित घटक अगदी पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत आला तरी संपूर्ण जाळलेला नाही. त्यामुळं याला उल्कापाता ऐवजी अशनीपात म्हणावे लागेल, तुलनेने ही दुर्मिळ घटना आहे, असं काही खगोलतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Meteor showers
राज ठाकरेंच्या भाषणावर भाजपची प्रतिक्रिया; फडणवीस, दरेकर म्हणाले...

दरम्यान, रावेर भागात आज सायंकाळी पावणे आठच्या सुमाराला शहरासह ग्रामीण भागात आकाशात मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होताना दिसला. यामुळे जनतेकडून आश्चर्य आणि भीतीही व्यक्त करण्यात येत होती. रविवारी २ एप्रिलला सायंकाळी पावणे आठच्या सुमाराला तालुक्याच्या वायव्य दिशेकडून पूर्वेकडे आकाशातून चार पाच मोठे प्रकाशाचे झोत नागरिकांना जातांना दिसले. अनेकांनी त्याच्या मोबाईल मध्ये फोटो काढले आणि व्हिडिओ शूटिंग देखील केले. सुरवातीला लोकांना ते रॉकेट किंवा विमाने असावीत असे वाटले.

या घटनेबाबत शहरी आणि ग्रामीण भागातूनही अनेक नागरिकांनी, ग्रामस्थांनी सकाळकडे दूरध्वनी करून आपले अनुभव सांगितले. सुमारे दहा ते पंधरा सेकंदांपर्यंत आगीचे व प्रकाशाचे झोत हे वेगाने पूर्वेकडे जात असल्याचे दिसले, असा प्रकार यापूर्वी कधीही आयुष्यात पाहिला नाही अशाही प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. पावणे आठ वाजता आकाशात गर्द काळोख असल्याने या उल्का वर्षावाच्या दृश्याचा आनंद घेता आल्याचेही नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.