Atiq Ahmed: अतिक अहमदच्या हत्येच्या निषेधाचे महाराष्ट्रात झळकले बॅनर, केला 'शहीद' असा उल्लेख

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली
Atiq Ahmed
Atiq AhmedEsakal
Updated on

गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज येथे गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी (15 एप्रिल) रोजी समोर आली होती. या घटनेचं काही लोक समर्थन करत आहेत तर काही लोक प्रखर विरोध करत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटत असून, बीडच्या माजलगावमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले होते. तसेच बॅनरवर या दोघांचा शहीद उल्लेख करण्यात आला होता.

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर दोघांच्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या बद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. तसेच हे बॅनर तात्काळ हटवण्यात आले आहे. मोहसीन भैय्या मित्र मंडळाकडून हा बॅनर लावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, मोहसीन पटेलचा पोलीस शोध घेत आहेत.

Atiq Ahmed
Pune Crime: धक्कादायक! कोयता गँगमधील चार अल्पवीयन मुलांचे बालनिरीक्षणगृहातून पलायन

दरम्यान या बॅनरबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच हे तिथून हटवले. पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, मोहसीन भैय्या मित्र मंडळाने हे बॅनर लावले होते. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या मोहसीन पटेलचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी हे बॅनर बनवणाऱ्या लोकांनाही ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी आणखी काही लोकांना अटक होऊ शकते.

Atiq Ahmed
Atiq Ahmed: अतिक अहमदच्या हत्येनंतर धीरेंद्र शास्त्रींचा मोठा निर्णय, बागेश्वर बाबाचं होतंय कौतुक

गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आल्याने सद्या उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

Atiq Ahmed
Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा फायनान्सर CBIच्या जाळ्यात, सिंगापूरवरून होतंय प्रत्यार्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.