शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकरने आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. नुकसानभरपाईच्या रकमेत सरकारकडून दुपटीने वाढ करण्यात आली आहे.
जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर एवजी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे. तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रती हेक्टर एवजी २७ हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी १८ हजार प्रती हेक्टर एवजी ३६ हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहेत. महसूल आणि वनविभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जून आणि ऑक्टोबरमहिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. यानंतर झालेल्या नुकसानीसाठी मदतीची मागणी केली जात होती. यानंतर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर पावसामुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ५ हजार ४३९ कोटींचा निधी तरतूद करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.