Nanded Hospital Deaths : खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा! 'डीन'ला टॉयलेट साफ करायला लावणं पडलं महागात

या घटनेवरून राजकारण पेटलं असून विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल केला जात आहे.
atrocity case filed against mp hemant patil after  forcing  dean to clean toilet video Nanded Hospital Death
atrocity case filed against mp hemant patil after forcing dean to clean toilet video Nanded Hospital Death Esakal
Updated on

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. या घटनेवरून राजकारण पेटलं असून विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. यादरम्यान शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी काल या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या डीनला टॉयलेट साफ करायला लावले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला. यानंतर आता खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हेमंत पाटील यांच्यावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

atrocity case filed against mp hemant patil after  forcing  dean to clean toilet video Nanded Hospital Death
Nanded News: शिंदे गटाच्या खासदाराने नांदेडमध्ये शासकीय रूग्णालयाच्या डीनला साफ करायला लावलं स्वच्छतागृह, Video Viral

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २४ तासांत २४ मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती दिली.

यानंतर मंगळवारी खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचा पाहणी दौरा केल. यावेळी पाहणी करताना त्यांच्या सोबत रुग्णालयाचे डीन (अधिष्ठाता) हे देखील होते. खासदारांनी रुग्णालयात अस्वच्छता पाहून डीन यांना स्वतः स्वच्छतागृह साफ करायला लावलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

atrocity case filed against mp hemant patil after  forcing  dean to clean toilet video Nanded Hospital Death
NewsClick: अभिसार शर्मा, उर्मिलेश यांच्यासह 9 पत्रकारांवर UAPA दाखल; सेटलवाड यांच्या घरी मुंबई पोलीस

 मी डीनचं समर्थन करत नाही. रूग्णालयाच्या डीनला असं वागवण्यापेक्षा शासनाकडून सफाईबाबत जे काही निर्णय घेणे अपेक्षित आहे. सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत. डीनकडून सफाई करून किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्याने काय होणार आहे? ही कृती उचित नाही अशी प्रतिक्रिया ही अशोक चव्हाण म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.