शाळेत ३० मिनिटे अगोदर शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक! २७४ शाळांची पटसंख्या घटली

शाळा भरण्यापूर्वी किमान ३०-४० मिनिटे अगोदर बहुतेक विद्यार्थी शाळेत येतात. जिल्हा परिषदेच्या २७४ शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे. अशी स्थिती असतानाही अनेक शाळांमधील शिक्षक सोडाच मुख्याध्यापक देखील शाळा भरायला १०-१५ मिनिटे कमी असताना येतात, हे विशेष.
zp school
zp schoolsakal
Updated on

सोलापूर : शाळा भरण्यापूर्वी किमान ३०-४० मिनिटे अगोदर बहुतेक विद्यार्थी शाळेत येतात. मात्र, जिल्हा परिषदेच्या २७४ शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे. अशी स्थिती असतानाही अनेक शाळांमधील शिक्षक सोडाच मुख्याध्यापक देखील शाळा भरायला १०-१५ मिनिटे कमी असताना येतात, हे विशेष. पण, त्यांना आता शाळेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेअंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. शाळांमध्ये अध्यापन व्यवस्थित सुरू आहे का, अध्यापन सोडून कोणी वैयक्तिक कामासाठी मोबाईल वापरतो का, यावर त्यांचा गरजेनुसार वॉच असावा. वास्तविक पाहता दूर अंतरावरून येणाऱ्या शिक्षकांनी त्या गावातच राहणे अपेक्षित आहे. परंतु, दळणवळणाची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने बहुतेक शिक्षक मुख्यालयात राहातच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी मुख्यालयात राहणाऱ्या शिक्षकांची मुले देखील त्याच जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकत होती. आता परिस्थिती बदलली आहे. दुसरीकडे, ‘ज्या शाळांमधील गुणवत्ता दर्जेदार, तेथील पटसंख्या मोठी’ असेही चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुलांना भविष्यातील वाटचालीचा यशस्वी मार्ग दाखविण्यात शिक्षकांचा खूप मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे अध्यापनात पिछाडीवर असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने वर्गशिक्षकांनी काहीवेळ अगोदर येऊन त्या मुलांना अध्यापन करणे आवश्यक आहे. इंग्रजी व खासगी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या टिकवणे हे शिक्षकांसमोरील मोठे आव्हान बनले आहे. त्यावर ‘गुणवत्ता वाढ’ हाच एकमेव पर्याय आहे.

एक हजार शिक्षकांच्या डिसेंबरअखेर बदल्या

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. मे महिन्यात पूर्ण होणारी बदलीची प्रक्रिया अजूनही संपलेली नाही. आंतरजिल्हा बदलीनंतर आता डिसेंबरअखेर जिल्हांतर्गत बदल्या होतील. त्यासाठी ‘संवर्ग एक’मधून (५३ वर्षांवरील, विधवा, परितक्त्या, दिव्यांग) ८७९ तर ‘संवर्ग दोन’मधून (पती-पत्नी एकत्रीकरण- ३० किलोमीटरपर्यंत अंतर आवश्यक) १२६ शिक्षकांनी अर्ज केले आहेत. एकाच शाळेवर तीन वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या बदल्या होत आहेत. बदलीसाठी जिल्ह्यातील एक हजार ३०२ शिक्षक पात्र आहेत, पण २९७ शिक्षकांनी अर्ज केलेले नाहीत. जानेवारी २०२३ पासून त्या शिक्षकांना नवीन शाळेत रुजू व्हावे लागणार आहे.

गुणवत्तावाढीलाच प्राधान्य

गावातील मुले शाळा भरण्यापूर्वी अर्धा-पाऊण तास अगोदर येतात, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या वर्गातील प्रत्येक मुलगा हुशार असायलाच हवा, या भावनेतून प्रत्येक शाळेतील शिक्षकांचे अध्यापन सुरू आहे. मुले लवकर येत असतील तर शिक्षक जादा तास देखील घेऊ शकतात. पण, शाळा भरण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे अगोदर शिक्षकांनी शाळेत हजर राहणे बंधनकारकच आहे.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()