Sharad Pawar : भातखळकरांच्या मेंदूचा खळ झालाय; राष्ट्रवादीची 'भातखळकर स्टाईल' टीका

Atul Bhatkhalkar, sharad pawar
Atul Bhatkhalkar, sharad pawaresakal
Updated on

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर विरोधकांवर जहरी टीका करण्यासाठी ओळखले जातात. भातखळकर यांनी केलेल्या टीका चर्चेत असतात. त्यातच त्यांनी मंगळवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर पत्राचाळ प्रकरणावरून आरोप केले होते. त्याला शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र आता राष्ट्रवादी पक्षाकडूनही भातखळकर यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. (Sharad Pawar News in Marathi)

Atul Bhatkhalkar, sharad pawar
ज्यांना बोटावर मोजण्याइतपत आमदारही निवडून आणता येत नाहीत...; पवारांचा राज ठाकरेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक महिला शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी भातखळकर यांच्यावर त्यांच्याच स्टाईलमध्ये टीका केली आहे. शरद पवार यांच्यावर पत्राचाळ प्रकरणी आरोप करणे याचा अर्थ अतुल भातखळकरांच्या मेंदुचा खळ झाला आहे, अशी जहरी टीका अनिता भामरे यांनी केली.

त्या म्हणाल्या, वास्तविक पाहता ईडीने कुठेही शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. भाजपमधील नेत्यांना उठसूठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांवर आरोप करून पक्षाची व नेत्यांची बदनामी करणे एवढेच काम आहे. आता शिवसेनेशी गद्दारी करून सत्ता मिळवली आहे तर जनतेची कामे करा, असं आवाहनही भामरे यांनी केले.

Atul Bhatkhalkar, sharad pawar
नवनीत राणा यांच्या मतदारसंघात 110 बालकांचा मृत्यू, 2 गरोदर मातांनी सोडले प्राण

भामरे पुढं म्हणाल्या की, कांदिवली पूर्व मतदार संघातील जनतेने ज्या उद्देशाने निवडून दिले ते सोडून दिवसभर विरोधी पक्षातील नेत्यांवर ट्विट करणे भातखळकरांनी बंद करावे. अन्यथा भविष्यात भाजपचा आयटी सेल सांभाळण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा टोलाही भामरे यांनी लागवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.