मुंबई : आज शुक्रवारी (ता.२५) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या आरोपांचा समाचार घेतला. केंद्रीय यंत्रणांचे प्रवक्ते म्हणून काम केले जात आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला. मला तुरुंगात टाका. पण कुटुंबीयांना त्रास देऊ नका. मी माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो, अशी विनंती ठाकरे यांनी भाजपला केला आहे. विरोधी पक्ष हक्काने तक्रारी घेऊन राज्यपालांकडे जातात. तसे प्रत्येक जण त्यांच्याकडे जातात. यावेळी ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे सांगितले. (Atul Bhatkhalkar Criticize Chief Minister Uddhav Thackeray For His Speech In Assembly)
सध्या तेच तेच चालू आहे, आहे असे ते म्हणाले. प्रसारमाध्यमांनी बातम्या जरुर दाखवाव्यात, कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल असे दाखवू नये, असे आवाहन ठाकरे यांनी माध्यमांना केले. यावेळी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता वाचून दाखवली. मुख्यमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषणावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करुन टीका केली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मुख्यमंत्री फेसबुकी शैलीत सभागृहात बोलले. मला अटक करा. पण शिवसैनिकांना त्रास नको असं म्हणाले. मुख्यमंत्री महोदय, अटकेचा मामला ऐच्छिक नसतो. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो कायदेश्वर, असा टोला भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.