पुणे : ज्या पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आधीच तुरुंगात आहेत. त्याच पत्राचाळ प्रकरणात आता शरद पवारांचं नाव आलंय. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रावर बोट ठेवत याप्रकरणातल्या सहभागाविषयी शरद पवारांचीही चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकरांनी केली आहे.
पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. त्या पत्राचाळ प्रकरणात आता शरद पवारांचे नाव पुढे आले आहे. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रावर बोट ठेवत याप्रकरणातल्या सहभागाविषयी शरद पवारांचीही चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. याबाबतीत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात भातखळकरांनी काय म्हटलं आहे?
मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात गुरुआशिष कंपनीला काम देण्यात यावं, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत संजय राऊतांनी बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भातळखकरांनी आपल्या पत्रातून उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.
भातखळकरांनी ही मागणी करताना त्यांनी ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राचा आधार घेतला आहे. या आरोपपत्रातून दोन महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. २००६-२००७ या कालावधीत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यामध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीनंतरच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून राकेश वाधवान यांच्याकडे पत्राचाळच्या विकासाचं काम देण्यात आलं होतं. पण हे माजी मुख्यमंत्री कोण होते याच्या नावाचा उल्लेख ईडीनं आरोपपत्रात केलेला नाही. या घोटाळ्यात १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं ईडीनं चार्जशीटमध्ये म्हटले आहे.
तसेच पत्राचाळ प्रकरणातील घडामोडींची माहिती संजय राऊत यांना होती. आणि तेच या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार आहेत असंही ईडीनं आरोपपत्रात म्हटलं आहे. या घोटाळ्यात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचंही ईडीनं आरोपपत्रात म्हटलं आहे.
पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे?
एक हजार ३४ कोटी रुपयांचा पत्राचाळ जमीन घोटाळा आहे. गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हणजेच म्हाडाचा भूखंड आहे. प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला, असा आरोप ईडीचा आहे. शिवाय प्रवीण राऊतांनी पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांचा संबंध कसा?
पत्राचाळ प्रकरणी झालेल्या व्यवहारातील सर्व पैसा प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले. यातील ८३ लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला. शिवाय, राऊतांच्या परदेश दौऱ्याचा खर्चही याच कंपनीनं केल्याचा संशय ‘ईडी’ला आहे.
तसेच पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत मागील दोन महिन्यांपासून अटकेत आहेत. अनेकदा प्रयत्न करुनही त्यांना जामीन मिळालेला नाहीये. १९ सप्टेंबरलाही राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता राऊतांनंतर शरद पवारांचं नाव आल्यानं राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.