खुल्ताबाद हे औरंगजेबाच्या कबरीसाठी नाही तर 'भद्रा मारुती' मुळे प्रसिद्ध झालंय

औरंगजेबाची कबर असलेल्या याच खुल्ताबादमध्ये भद्रा मारूती मंदीर फेमस आहे.
Bhadra Maruti
Bhadra MarutiSakal
Updated on

औरंगजेबाची कबर. सध्या हा विषय चर्चेत आहे. औरंगाबादचे खासदार जलील आणि तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं आणि चर्चेला उधाण आलं. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंग्याच्या कबरीचं दर्शन घेण्याचा काय संबंध? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. हे तर सोडाच पण औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला असाही सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला होता. पण महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा आणि विविध नैसर्गिक पैलूंनी नटलेलं मराठवाड्यातील हे शहर. तिथून हाकेच्या अंतरावर असलेलं खुल्ताबाद. औरंगजेबाची कबर असलेल्या याच खुल्ताबादमध्ये भद्रा मारूतीचं मंदीर प्रसिद्ध आहे.

भद्रा मारुती मंदीर, खुल्ताबाद
भद्रा मारुती मंदीर, खुल्ताबादSakal

खरं तर खुल्ताबादचं मूळ नाव भद्रावती. रत्नापूर म्हणून देखील खुल्ताबादला ओळखलं जात होतं. येथे असलेलं हे हनुमानाचे प्राचीन मंदीर. शयनावस्थेत असलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव हनुमानाचं मंदीर. वेरूळच्या प्रसिद्ध लेण्यापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर हे मंदीर आहे. हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आणि नवसाला पावणारा मारूती म्हणून भद्रा मारुतीची ओळख आहे. शयनावस्थेत असलेल्या हनुमानाची भारतात फक्त तीन मंदिरे आहेत. एक खुल्ताबादमधील भद्रा मारूती. दुसरे प्रयगाराजमधील मंदीर आणि तिसरे मध्यप्रदेशमधील जाम सवाली येथील मंदीर.

भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. हा रामाचा उत्कट भक्त होता आणि त्याच्या स्तुतीमध्ये गाणी गात असे. एके दिवशी हनुमानजी आकाशातून जात असतांना त्यांना ही गाणी ऐकू आली. रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तीगीते ऐकत त्या ठिकाणी उतरले. आणि ते मंत्रमुग्ध झाले. त्यांनी भव्य योगमुद्रा धारण केली त्यालाच 'भावसमाधी' म्हणतात. राजा भद्रसेनाने त्याचे गाणे संपवले तेव्हा तो हनुमानाची मुर्ती पाहून आश्चर्यचकित झाला. राजाने हनुमानजींचे दर्शन घेऊन त्यांना कायम तेथे वास्तव्य करण्याची मागणी केली तेव्हापासून हनुमान भद्र म्हणजे शांत मुद्रेत तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचा थांबला आहे. तेव्हापासून हे स्थान भद्रा मारुती म्हणून ओळखलं जाऊ लागलं अशी आख्यायिका आहे.

भद्रा मारुती मंदीर, खुल्ताबाद
भद्रा मारुती मंदीर, खुल्ताबादSakal

तसं बघितलं तर हनुमान जयंती चैत्र पोर्णिमेच्या दिवशी भद्रा मारुतीची जत्रा असते. औरंगाबाद शहरापासून खुल्ताबादपर्यंत भाविक या यात्रेसाठी पायी रांगा लागलेल्या असतात. भद्रा मारुती म्हणजे हनुमान भक्तांसाठी शहराजवळ असलेलं मोठं मंदीर. तसं बघितलं तर खुल्ताबाद औरंगाबादमधून २५ किमी अंतरावर असेल पण हनुमान जयंतीच्या वेळी भाविक तेवढं अंतर चालत जातात. भद्रा मारुती संस्थान म्हणून आजही खुल्ताबादची ओळख प्रसिद्ध आहे.

मूळ भद्रावती असलेल्या या गावात मध्ययुगात मुघलांचं शासन होतं. औरंगजेबाने दख्खनमध्ये आल्यावर तो खडकी (सध्याचे औरंगाबाद) येथे वास्तव्याला होता. स्वराज्यावर डोळा ठेवून असलेल्या औरंगजोबाला मराठ्यांनी याच मातीत गाडले पण शेवटपर्यंत स्वराज्यावर ताबा मिळवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. भद्रावती म्हणजे आजच्या खुल्ताबादेच्या मराठी मातीत मुघलांच्या अनेक कबरी आपल्याला दिसतात. आजही त्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देतात.

जवळच जगप्रसिद्ध वेरूळ लेणी असल्यामुळे या भागाला पर्यटनाचं माहेरघरंच म्हणावं लागेल. भद्रावती हे खरं नाव असलेल्या गावात अन् कबरींच्या मातीत भद्रा मारुतीचं मंदीर आजही तोऱ्यात उभं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.