औरंगाबाद शहर बस ठरली देशात ‘स्मार्ट’

कोरोना संसर्गाच्या लॉकडाउननंतर शहर बसने कात टाकली. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवीन डिजिटल सुविधा देण्यात आल्या
bus
busbus
Updated on

औरंगाबाद: स्मार्ट सिटी अभियानात सुरू करण्यात आलेली स्मार्ट शहर बस देशात अव्वल ठरली आहे. या बसने अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्डस (आयएसएसी) २०२० जिंकला आहे. याबाबतची घोषणा केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने शुक्रवारी (ता.२५) केली.

स्मार्ट सिटी अभियानाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय अवासन व शहरी कामकाज विभागाचे मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि स्मार्ट सिटीज मिशनचे संचालक कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात ही घोषणा झाली. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्यासह स्मार्ट सिटीची टीम या कार्यक्रमास व्हीसीद्वारे सहभागी झाली होती.

bus
मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला; बीडमधील स्थिती चिंताजनक

प्रवाशांसाठी आकर्षक सुविधा-
कोरोना संसर्गाच्या लॉकडाउननंतर शहर बसने कात टाकली. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवीन डिजिटल सुविधा देण्यात आल्या. त्यात ई-तिकिट, प्रवाशांच्या सुविधेसाठी स्मार्ट कार्ड, बस ट्रॅकिंग मोबाइल अ‍ॅपचा समावेश आहे. आता या बससेवेत प्रवाशांसाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या एका कार्डाद्वारे नागरिक वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवा वापरू शकतात.

तत्कालीन आयुक्तांचे विशेष प्रयत्न-
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा एएससीडीसीएलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निपुण विनायक यांनी ही बससेवा जास्तीत जास्त काळ चालावी यासाठी एसटी महामंडळाचे सहकार्य घेतले. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळ व औरंगाबाद स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनमध्ये करार झाला. दरम्यान, विद्यमान आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम्, मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी, राम पावनीकर, सिद्धार्थ बनसोड, विशाल खिल्लारे, ऋषिकेश इंगळे, माणिक निला हे परिश्रम घेत आहे. दरम्यान, स्मार्ट सिटी मिशनमध्ये शहर बसला पुरस्कार मिळाल्याबद्दल आस्तिककुमार पांडेय यांनी स्मार्ट सिटी टीमचे अभिनंदन केले.

bus
पक्षादेश डावलणाऱ्यांवर कारवाई होणार, चंद्रकांत खैरेंचा इशारा

यामुळे स्मार्ट बस अव्वल

- स्मार्ट सिटी अभियानात बससेवेचा समावेश
- २०१९ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्‍त डॉ. निपुण विनायक, मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते ‘माझी स्मार्ट बस’चे लोकार्पण
- औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महापालिकेतर्फे २०२० मध्ये कोरोना रुग्णवाहिका म्हणून बसचा वापर
- ताफ्यात शंभर बस
- आतापर्यंत ५२ लाख किलोमीटर प्रवास
- ८७ लाखांहून अधिक प्रवाशांनी घेतला लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()