सरपंच पदासाठी 14.50 लाखांची बोली, सरकार दरबारी मात्र निवडणूक बिनविरोध केल्याचा बनाव

aurangabad news
aurangabad newsesakal
Updated on

औरंगाबादः औरंगाबद जिल्ह्यातल्या एका गावामध्ये चक्क सरपंच आणि उपसरपंच पदासाठी बोली लागल्याचा प्रकार घडला आहे. इकडे सरकार दरबारी मात्र निवडणूक बिनविरोध झाल्याचा बनाव करण्यात आला आहे.

'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले असून औरंगाबादमधल्या शेलुद गावात हा प्रकार घडला आहे. शेलुदमध्ये सरपंच पदासाठी साडेचौदा लाख रुपये आणि उपसरपंच पदासाठी चार लाख रुपयांची बोली लागली होती.

aurangabad news
Rahul Gandhi : अमित शाहांनी फक्त जम्मू ते काश्मीर यात्रा करुन दाखवावी, राहुल गांधींचं चॅलेंज

गावातल्या मंदिरसमोर ग्रामसभा बोलावून हा कार्यक्रम बिनबोभाट करण्यात आला. सरपंचपदी शकुंतला ससेमगर तर उपसरपंच पदासाठी राजू म्हस्के यांची निवड झाली. प्रशासनाकडे मात्र ही निवड बिनविरोध झाल्याचं सांगण्यात आलं.

सरपंच आणि उपसरपंच पदासाठी सौदेबाजी झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारे पदं विकत घेऊन खुर्च्या मिळवणं दुर्दैवी आहे. शेलुद गावामध्ये सरपंच आणि उपसरपंच निवडीत घोडेबाजार झाल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे.

याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. परंतु यासंदर्भातला एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदासाठी बोली लावल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.