Aurangzeb : औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला मग त्याची कबर औरंगाबादमध्येच का बांधली गेली?

औरंगजेबचा मुलगा आझम शाह याने खुलदाबाद येथे त्याची कबर उभारली.
Aurangzeb
Aurangzeb sakal
Updated on

Aurangzeb  : शेवटचा प्रभावी मुघल शासक मानला जाणाऱ्या औरंगजेबचा मृत्यू ३ मार्च, १७०७ साली नगर येथे झाला. औरंगजेबचा मुलगा आझम शाह याने खुलदाबाद येथे त्याची कबर उभारली. खुलदाबाद हे समाधीचे गाव म्हणून ओळखले जाते.

आपला दफन विधी खुलदाबाद मधील शेख झैन-उद्-दिन (औरंगजेबचा अध्यात्मिक गुरू) यांच्या दर्गा जवळ करावा, अशी औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा होती. ही इच्छा त्याच्या मुलाने पुर्ण केली. (Aurangzeb death anniversary why The Tomb of Aurangzeb is located in Khuldabad Aurangabad read story)

औरंगजेबाची मृत्यूपूर्व अशीही इच्छा अशी होती की त्याची समाधी सुद्धा एकदम साध्या पद्धतीने बांधावी जी त्याच्या स्वकमाई च्या पैशातून असेल. कबर अत्यंत साधी बनवावी, तिच्यावर सब्जाचं झाडं लावावं आणि वरच्या बाजूला छत वगैरे नसावं, असं मृत्यूपत्रात नमुद होतं.

त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या मुलाने समाधी अवघ्या १४ रुपये १२ आणे इतक्या पैशात उभारली. असं म्हणतात की हे पैसे औरंगजेबाने स्वतः टोप्या विणून व विकून कमावले होते.

Aurangzeb
Aurangzeb Love Story: दासीच्या प्रेमाखातर औरंगजेब दारूचा घोट घ्यायला निघाला होता

औरंगजेबाला आवडायचं औरंगाबाद

औरंगजेबचे वडिल शाहजहान बादशाह असताना त्यांनी औरंगजेबाला सुभेदार म्हणून दौलताबादला पाठवलं.हा औरंगजेबाच्या पहिल्या सुभेदारीचा कार्यकाळ होता. इतिहासकरांच्या मते औरंगजेबला औरंगाबाद आवडायचं

त्यामुळे त्याने दौलताबादचं मुख्यालय बदलून औरंगाबाद पसंत केलं होतं. औरंगजेबाला औरंगाबाद एवढं आवडायचं की औरंगजेब वेरूळ, दौलताबाद असं दख्खनमध्ये सगळीकडे फिरायचा.औरंगजेबानं औरंगाबादेत अनेक वास्तू बांधल्या. यात किले अर्क आणि हिमायत बागेसारख्या अनेक बागांचा समावेश होता. आता औरंगाबाद या शहराचं नामांतर झाले असून हे शहर आता छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.