Chhagan Bhujbal : ''उरलासुरला पक्ष संपवायला बाहेरच्या लोकांची गरज नाही'', आव्हाडांच्या विधानावर भुजबळांची खरमरीत टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील कार्यक्रमामध्ये छगन भुजबळांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी शरद पवार गटावर सडकून टीका केली.
Chhagan Bhujbal : ''उरलासुरला पक्ष संपवायला बाहेरच्या लोकांची गरज नाही'', आव्हाडांच्या विधानावर भुजबळांची खरमरीत टीका
Updated on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील कार्यक्रमामध्ये छगन भुजबळांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी शरद पवार गटावर सडकून टीका केली. शिवाय जितेंद्र आव्हाडांच्या श्रीरामांबद्दलच्या विधानाचाही समाचार घेतला.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही भाजपसोबत गेलो म्हणून आमच्यावर टीका केली जाते. परंतु त्यांनी याचसाठी सहा ते सात वेळा चर्चा केली होती. आपण विचार सोडलेला नाही उलट विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला नाही. केवळ भावनेच्या आधारावर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही.

'राम मांसाहारी होता' या जितेंद्र आव्हाडांच्या विधानामुळे बराच गदारोळ झाला. त्यावर भुजबळांनी खरमरीत टीका केली आहे. ते म्हणाले, रामाबद्दल विधान करुन काही लोक त्यांचाच पक्ष संपवायला निघाले आहेत. पक्ष संपवायला त्यांना बाहेरच्या लोकांची गरज नाही, हीच मंडळी पक्ष संपवतील. काय बोलता, काय करता.. असेल तुमचा अभ्यास. मात्र सध्याची परिस्थिती काय, वेळ काय.. लोकांच्या भावना काय आहेत, याचातरी विचार करा.

Chhagan Bhujbal : ''उरलासुरला पक्ष संपवायला बाहेरच्या लोकांची गरज नाही'', आव्हाडांच्या विधानावर भुजबळांची खरमरीत टीका
Mumbai News : नामचीन गुंड डोळा दाते जेरबंद; हातात कोयता घेऊन फिरत असतानाच आवळल्या मुसक्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांना आवाहन करताना भुजबळ म्हणाले की, खेकड्यासारखं वागू नका, एकमेकांना साथ देण्याचा प्रयत्न करा. महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी इतर सगळ्या आघाड्यांनी एकजुटीने काम केलं पाहिजे.

''आम्ही सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतला म्हणजे विचारधारा बदलली नाही. नितीश कुमारसुद्धा भाजपसोबत गेले होते, पण त्यांनी विचारधारा बदलली नाही. आमचीही तीच फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा आहे. सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आहे. त्यामुळे तुम्हीही ग्राऊंडवर उतरून काम करा'' असं आवाहन छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Chhagan Bhujbal : ''उरलासुरला पक्ष संपवायला बाहेरच्या लोकांची गरज नाही'', आव्हाडांच्या विधानावर भुजबळांची खरमरीत टीका
PM Modi : पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त टिपण्णी केल्यानंतर मरियम शिऊना निलंबित; तीन मंत्र्यांवर कारवाई

यावेळी भुजबळांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. मराठा आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मुळात हीच भूमिका सगळ्यांची आहे. परंतु मी फक्त अभ्यासपूर्ण मांडणी करतो आहे, एवढंच. येत्या काळामध्ये आपल्याला सर्व समाजाला हे मुद्दे पटवून द्यायचे आहेत, असं म्हणत त्यांनी कामाला लागण्याचं आवाहन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.