Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर

अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandiresakal
Updated on

मुंबईः अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे.

शुक्रवार, दि. १९ जानेवारी सामान्य प्रशासन विभागाने एक पत्रक काढून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी अयोध्येत राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. त्यानिमित्त राज्य सरकारने सुट्टी जाहीर केलीय.

Ayodhya Ram Mandir
ICC U-19 World Cup : पाच विजेतेपदं पटकावणाऱ्या भारतासमोर तगडं आव्हान... भारताचे U-19 वर्ल्डकप वेळापत्रक एका क्लिकवर

पेटीएम या आघाडीच्या मोबाईल वॉलेट कंपनीने बसचे मोफत तिकीट देण्याची घोषणा केली आहे. (One97 Communications Limited (OCL)ने अयोध्येला जाण्यासाठी मोफत बस तिकीट सेवा सुरू केली आहे. ही कंपनी पेटीएमच्या मालकीची आहे.

Ayodhya Ram Mandir
Saturday Trading Session: इतिहासात पहिल्यांदाच शनिवारीही शेअर बाजार राहणार सुरू; काय आहे कारण?

जर तुम्हाला अयोध्येतील सोहळा टीव्हीवर पहायचा असेल, तर 22 जानेवारी रोजी सकाळपासूनच दूरदर्शनवर याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स पोहोचवण्यासाठी दूरदर्शनची टीम तैनात असणार आहे. यासाठी अयोध्येत ठिकठिकाणी दूरदर्शनचे सुमारे 40 कॅमेरे लावण्यात येतील. सकाळी 11 वाजेपासून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.