Prakash Ambedkar: "भाजप-आरएसएस देवाचा वापर ईव्हीएमसारखा करताहेत"; प्रकाश आंबेडकारांची टिप्पणी

राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांना मिळालं आहे. पण त्यांनी या सोहळ्याला जाण्यास नकार दिला आहे.
prakash ambedkar
prakash ambedkar
Updated on

मुंबई : राम मंदिराच्या उद्गाटन सोहळा हा पूर्णपणे भाजप-रा. स्व. संघाचा राजकीय विषय असल्याचा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भाजप देवाचा वापर ईव्हीएमसारखा करत आहे, अशी टिप्पणी केली आहे. (Ayodhya Ram Temple BJP RSS is using God like EVM says Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर यांना काल रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं आहे. पण हा सोहळा राजकीय असल्याचं सांगत त्यांनी या कार्यक्रमाला जायला नकार दिला आहे. "गेल्या 10 वर्षांत, भाजप-आरएसएसनं अनेक भारतीय चिन्हं आणि त्यांचा वारशांना आपल्याशी जोडलं आहे. (उदा. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, टागोर, भगतसिंग) कारण भाजप-संघामध्ये यांच्या श्रेणीतलं कोणीही नाही" असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

prakash ambedkar
Karuna Sharma: करुणा शर्मांचे पुन्हा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; ठाकरे, चाकणकर, फडणवीस, सुप्रिया सुळेंना घातलं साकडं

"आता भाजप-संघ कोणतीही नैतिकता आणि तत्त्वे न ठेवता आपल्या निवडणूक फायद्यासाठी आता राम मंदिर उद्घाटनाचा वापरही असाच करुन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप-रा. स्व. संघ देव ईव्हीएमसारखा वापरत आहेत. लाज बाळगा" असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.