Bacchu Kadu : भाजप-काँग्रेसमध्ये धमक असेल तर 'यांच्या' कमी कराव्यात; बच्चू कडूंचं थेट आव्हान

Bacchu Kadu On mlas and professors salary : प्रहार पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आमदार आणि प्राध्यापकांच्या पगारांबद्दल मोठं वक्तव्य केले आहे.
  Bacchu Kadu On  mlas and professors salary
Bacchu Kadu On mlas and professors salary
Updated on

प्रहार पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आमदार आणि प्राध्यापकांच्या पगारांबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. कडू यांनी थेट भाजप आणि काँग्रेस पक्षाला आव्हान दिलं असून धमक असेल तर प्राध्यापक आणि आमदाराच्या पगारी कमी कराव्यात असं ते म्हणाले आहेत.

आमचे 25 देखील आमदार निवडून आले तर आम्ही प्राध्यापक आणि आमदाराच्या पगारी कमी करण्याचं पहिलं काम करू. भाजप आणि काँग्रेसमध्ये धमक असेल तर त्यांनी करून दाखवावे. प्राध्यापकाला अडीच लाख आमदारांना तीन लाख एवढा पगार कशासाठी? एका पंक्तीमध्ये काहीच नाही तर दुसऱ्या पंक्तीमध्ये बळच टाकताय. कुणाच्या बापाचं राज्य आहे का? आम्ही मतं देतोय त्यामुळे ही गुंडागर्दी चालणार नाही, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे एका खाजगी कार्यक्रमादरम्यान कडू बोलत होते.

  Bacchu Kadu On  mlas and professors salary
Ladki Bahin Yojana : अबब एवढे! विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारची उधळपट्टी; योजनांच्या प्रसिद्धीसाठी खर्च करणार 'इतके' कोटी

शरद पवारांच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया

पुढे बच्चू कडू यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित सामाजिक एकता परिषदेत बोलताना मणिपूरमधील घटनांप्रमाणे महाराष्ट्रात अशांततेची भीती व्यक्त केली होती. याबद्दल विचारण्यात आल्यानंतर बच्चू कडू म्हणाले की, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने सोसल्या आहेत. महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती होईल असं काहीही चित्र नाही, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने सोसल्या आहेत. याचा अनुभव महाराष्ट्रातल्या लोकांना आहे.

अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखी स्थिती होते की काय अशी चिंता वाटू लागल्याचे वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. शरद पवारांचा हा दावा खोडून काढत असं कुठलंही चित्र नसल्याचं बच्चू कडूंनी म्हटले. तसेच अशी अवस्था होऊ नये अशी प्रार्थना करतो असेही आमदार बच्चू कडू म्हणालेत.

  Bacchu Kadu On  mlas and professors salary
Sharad Pawar: " महाराष्ट्रातही निर्माण झाली असती मणिपूरसारखी परिस्थिती पण.. ", शरद पवारांनी सांगितलं कारण

शरद पवार काय म्हणाले होते?

मणिपूर आणि देशातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना शरद पवार म्हणाले होते की, मणिपूरमधील हिंसाचारामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली, महिलांना त्रासाला सामोरे जावे लागले तर शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. एकेकाळी मणिपूरमध्ये जिथे दोन समुदाय एकत्र राहत होते, आता ते एकमेकांशी बोलायलाही तयार नाहीत. आज जे काही घडलं त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना तिथे जाऊन जनतेला दिलासा द्यावा, असं कधीच वाटलं नाही. हा प्रकार मणिपूरमध्ये घडला. शेजारील राज्यांमध्येही असेच घडले. कर्नाटकातही तेच दिसून आले आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही असेच घडण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, महाराष्ट्राला समरसतेची आणि समतेची दिशा देणाऱ्या अनेक दिग्गजांचा वारसा आहे. त्यामुळे अशा घटनांना राज्यात स्थान मिळणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()