Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदारांत नाराजी? बच्चू कडू स्पष्टीकरण देत म्हणाले…

काही आमदार अयोध्या दौऱ्याला गेले नसल्याने नाराजीच्या चर्चा सुरू
Bacchu kadu
Bacchu kaduSakal
Updated on

राज्यात सत्तांतर झालं त्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी सरकार स्थापन केलं. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे सरकारमधील आमदारांत नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

बच्चू कडू बोलताना म्हणाले कि, “आमच्या सरकारचा कार्यकाळ आता सात ते आठ महिने उरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची मानसिकता सरकारची नाही. म्हणून मला वाटतं, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापेक्षा ‘जैसे थे’ स्थितीत सरकार चालवणं योग्य आहे.”

तर पुढे ते बोलताना म्हणाले कि, “सध्या अडचण पालकमंत्र्यांची आहे. एका जिल्ह्याला एक पालकमंत्री असेल तर त्या जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावायला सोपं जातं. पण एकाच व्यक्तीकडे ८-९ जिल्हे असल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढत आहेत. हे मात्र खरं आहे.”

Bacchu kadu
Nashik Crime News: विनामस्तक धड आढळल्याने खळबळ; तीन वर्षीय बालिकेचे धड...

त्याचबरोबर शिवसेनेचे (शिंदे गटाचे) अनेक आमदार अयोध्या दौऱ्यावर गेले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या गटात अस्वस्थता असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्याबद्दल बच्चू कडू म्हणाले, “प्रभू श्री रामचंद्राबद्दल आमच्या मनात प्रचंड आस्था आहे. मला अयोध्येला जाण्याची इच्छा होती. पण, मार्केट समितीच्या निवडणुका असल्यामुळे त्याची आखणी करत होतो. रोगनिदान शिबिरही असल्यामुळे मला अयोध्येला जात आलं नाही.”

“मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्यानं नाराजी असण्याचे कारण नाहीच. २०२४ नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता आहे, इथेपर्यंत ठिक आहे. पण, बंडखोरी होईल, अशी स्थिति नाही. आमच्यातही कधी नाराजीचा सूर येतो, पण कालांतराने जातो,” असंही पुढे बच्चू कडू म्हणालेत.

Bacchu kadu
Weather Update: राज्यात पाच दिवस गारपीट, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.