Manoj Jarange : मुंबईतील आंदोलनाआधीच बच्चू कडू जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, सरकारने ८० टक्के काम...

जरंगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचं सांगितलंय आहे. येथे मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकही मोठ्या संख्येने जमणार आहेत.
bacchu kadu Meet manoj jarange before maratha reservation agitation hunger strike in mumbai azad maidan
bacchu kadu Meet manoj jarange before maratha reservation agitation hunger strike in mumbai azad maidan
Updated on

मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे यांना सरकारने दिलेली २४ डिसेंबरची मुदत उलटून गेली आहे, मात्र अद्याप मराठा आरक्षणाबाबत सरकारला कोणतीही ठोस घोषणा करता आलेली नाही. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा करून सरकारच्या अडचणीत वाढ केली आहे.

जरंगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचं सांगितलंय आहे. येथे मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकही मोठ्या संख्येने जमणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू हे आज सकाळी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जालण्यातील अंतरवली सराटी येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी २० तारखेला जरांगेंसोबत आपण देखील मुंबईच्या दिशेने निघणार आणि आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

सराकरकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले की, सकल मराठ्यांना आरक्षण कसं भेटेल यासाठी सहज चर्चा करण्यासाठी आपण भेटीसाठी आल्याचे बच्चू कडू म्हणाले. चर्चा केल्याशिवाय मार्ग निघत नाही. आत्तापर्यंत सरकारने साधारणपणे ८० टक्के काम केल्याचं दिसतं. जातीचे दाखले भेटणे गरजेचे आहे. एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं आणि ते भेटले नाही तर त्याला अर्थ उरत नाही. त्यासाठी प्रशासनाने काय काम केलं पाहिजे ते पाहण्यासाठी आलो आहे.

bacchu kadu Meet manoj jarange before maratha reservation agitation hunger strike in mumbai azad maidan
मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! राजधानीतील महत्वाच्या निवडणुकीत हरला पक्ष, भारत समर्थक उमेदवार विजयी

जरांगे यांच्याकडून वेळ घेण्यासाठी मी आलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं. २० तारखेला आंदोलन होणारच अशून, मी आंदोलन थाबवण्यासाठी आलो नाही. मी स्वतःच आंदोलनात सहभागी होणार असे बच्चू कडू म्हणाले.

आंदोलन झाल्यानंतर तोच तोडगा निघत असेल तर तो आंदोलनापूर्वीच झाला पाहिजे. सगे सोयऱ्यांची व्याख्या तयार केली पाहिजे. पाच-सहा व्याख्या तयार झाल्या तर त्या प्रशासकीय बसल्या पाहिजेत. उद्या कोणी कोर्टात जाता कामा नये. हे २० तारखेपर्यंत शक्य आहे का विचारल्यावर हे चर्चा झाल्यावर कळेल असेही कडू यांनी स्पष्ट केलं.

bacchu kadu Meet manoj jarange before maratha reservation agitation hunger strike in mumbai azad maidan
Who is Milind Deora : चक्क अंबानी ज्याचा प्रचार करायचे असा भारतातील एकमेव राजकीय नेता, कोण आहेत मिलिंद देवरा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.