मुंबई : बच्चू कडू आणि रवी राणा या दोन्ही आमदारांमधील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. यापार्श्वभूमीवर कडू यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि मला वाद वाढवायचा नाही, आता वाद मिटला असं स्पष्ट केलं. रवी राणांना भेटण्याचा प्रयत्न करतो, आम्ही दोघं एकत्र जेवणही करु, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. (Bacchu Kadu Meet Ravi Rana today will get dinner together Bachu Kadu on controversy)
बच्चू कडू म्हणाले, खासदार नवनीत राणाही म्हणताहेत की दोघांनी आता वाद मिटवावेत. यासाठी मी त्यांचे धन्यवाद देतो, कारण त्यांनी योग्य प्रश्न मांडला. कारण वादातून कोणाचं भलं झालं असतं तर या वादाचा उपयोग झाला असता. उलट मी सभा घेतली आणि राणाजींचे आभार मानले. मला वाद करायचा नाही. पण राणा काल दुपारी तीन वाजता म्हणाले आता प्रश्न मिटला, त्यानंतर सहा वाजता म्हणतात घरात घुसून मारु. आज काय म्हणतात, पुन्हा वाद मिटला. यामुळं गोंधळ निर्माण होत आहे.
हे ही वाचा : राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?
त्यामुळं आता मी देखील ठरवलं आहे की, आपण कोणाच्या मनात गोंधळ निर्माण करायचा नाही, शांत रहायचं. माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला, तर राज्यात गोंधळ होतो. त्यांच्याकडून मला अपमानित करण्याचा प्रयत्न झाला. इतिहासात अत्ताच सत्ता परिवर्तन झालेलं नाही अनेकदा असं झालं आहे. मला खोक्यांवरुन त्यांनी डिवचलं तर मी देखील त्यांना म्हणू शकतो की, तुम्ही राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर निवडून आला तर तुम्ही देखील पैसे घेऊन निवडून आलात असं आम्ही म्हणायचं का? आरोप प्रत्यारोप इतक्या खालच्या पातळीवर जायला नको. सत्तेसाठी राजकारणासाठी एकत्र नाही आलो तरी आम्ही जिल्ह्यासाठी एकत्र यायला तयार आहोत, असंही यावेळी बच्चू कडू म्हणाले.
पण माध्यमांची इच्छा असेल तर मी रवी राणांना नक्की भेटतो. आज संध्याकाळी भेटण्याचा प्रयत्न करतो. या भेटीवेळी आम्ही एकाच पंगतीत जेवायला बसू. एकनाथ शिंदे हे अधिक संवेदनशील आहेत. त्यांनी माझ्या मतदारसंघातील २० हेक्टरवरील जमीनीच्या सिंचनाला परवानगी दिली. एका महिन्यात शेतकरी आनंदणार यापेक्षा आनंदी गोष्ट काय असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.