Bacchu Kadu On Portfolio Distribution: 'राष्ट्रवादीने व्यवस्थित दबाव आणला…', खातेवाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

आमदार बच्चू कडू यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली
Bachchu Kadu On Portfolio Distribution
Bachchu Kadu On Portfolio DistributionEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या राज्यमंत्रीमंडळाचं शुक्रवारी अखेर खातेवाटप झालं. यामध्ये अनेक मह त्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मिळाली आहेत. तर अजित पवारांना अर्थखातं देऊ नये, यासाठी शिंदे गटातील आमदार विरोध करत होते. तरादेखील अजित पवारांकडे अर्थखातं देण्यात आलं आहे, तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, क्रीडा, महिला आणि बालकल्याण अशी महत्त्वाची खाती मिळाली आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील काही आमदार नाराज झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.  (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव आणला आणि यशस्वी झाले', अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.(Latest Marathi News)

'मंत्रिमंडळाच्या खातेवाटपामध्ये उशिरा आलेल्या राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं गेलं आहे, असं एकंदरीत दिसत आहे. आता जे काही राहिलेले लोक आहेत, त्यांच्या नशिबी काय येईल? हे मला माहीत नाही. आता जे खातेवाटप झालं आहे, ते अजित पवार यांच्या सोयीनुसार झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाब आणला आणि ते यशस्वी झाले', असं बच्चू कडू एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले आहे. (Marathi Tajya Batmya)

Bachchu Kadu On Portfolio Distribution
Ajit Pawar PM Meet: राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांची दुसऱ्यांदा दिल्ली वारी, पहिल्यांदाच घेणार PM मोदींची भेट

अजित पवारांना अर्थ खातं मिळण्याबाबत प्रश्न केला असता बच्चू कडू म्हणाले, 'अजित पवारांना अर्थखातं मिळू नये, असं सर्वांचं मत होतं. कारण ज्यावेळी राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. तेव्हा शिवसेनेच्या आमदारांना २५ लाख तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ९० लाखांचा निधी देण्यात येत होता. पण, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते अजित पवारांवर नजर ठेवतील, असं वाटतंय', असंही कडू म्हणाले आहे.(Latest Marathi News)

Bachchu Kadu On Portfolio Distribution
Sakal Survey : उलथापालथ ‘राष्ट्रवादी’त, धाकधूक भाजपमध्ये!

अजित पवार मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांचा कालखंड पाहिला, तर नाहीही म्हणू शकत नाही. आणि हो सुद्धा म्हणू शकत नाही. कारण, अंदाज लावण्याच्या पलीकडे राजकारण सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत घडलेल्या घटना यापूर्वी कधीच पाहिल्या नाहीत', असंही कडू म्हणाले आहेत.

Bachchu Kadu On Portfolio Distribution
Maharashtra Politics : महाराष्ट्रात मिशा पिळायच्या अन् दिल्लीला साडी नेसून जायचं; 'या' साहित्यिकानं कोणावर साधला निशाणा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.