Bacchu Kadu: '...यापुढे सरकारनं आणखी चार जणांना दुखवू नये', बच्चू कडूंचा महायुती सरकार सल्ला

आमदार बच्चू कडू यांची नाराजी पुन्हा उघड
Bacchu Kadu
Bacchu KaduEsakal
Updated on

राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार येऊन वर्षाचा कालावधी उलटला आहे. आता त्यांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गटाची देखील साथ मिळाली आहे. अजित पवारांसह अनेक राष्ट्रीवादीच्या आमदारांना मंत्रिपदाची खुर्ची मिळाली. आता इतर पक्षातील आमदारही मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. अजित पवार यांच्या येण्यामुळे अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

'आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मी अमेरिकेला जाईन. मी मंत्रिमंडळ विस्ताराला हजर राहणार नसल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर 'आता सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करू नये. आता जसं आहे तसं चालू ठेवावं. मंत्रिमंडळ विस्तार करुन विनाकारण चार लोकांना दुखवू नये, असा सल्ला बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे.

सध्या सरकार चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता जे मंत्री आहेत ते सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली आहे.

Bacchu Kadu
Amit Shah Pune Visit: 'राजकीय भेटी ते CRCS पोर्टलचे उद्घाटन', असं आहे अमित शहांच्या पुणे दौऱ्याचं वेळापत्रक

पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं; CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवार) संध्याकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. आज ते पिंपरी-चिंचवड येथील मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे. अमित शाह यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर राहणार आहेत.

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुण्यात आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरात्रीपर्यंत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

Bacchu Kadu
Mumbai Breaking : लोकलमध्ये साखळी स्फोटांची धमकी; पोलिसांना आला फोन, मुंबईत एकच खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.