Bachchu Kadu : मागण्या पूर्ण करा, विधानसभा लढणार नाही : बच्चू कडू

‘सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर विधानसभा निवडणुकीतून मी माघार घेईन आणि माझी जागा महायुतीला देईल,’’
Bachchu Kadu
Bachchu Kadu sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘‘सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर विधानसभा निवडणुकीतून मी माघार घेईन आणि माझी जागा महायुतीला देईल,’’ अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

आम्ही स्वबळाऐवजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढणार. आमच्या मागण्या व मुद्दे मान्य केले तर माझीही जागा युतीला देऊन त्यांच्या पायी प्रचार करेल’, असे ते म्हणाले. ‘क्रांतिदिनी (ता. ९ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी, अपंग, निराधार जनतेसाठी मोठ्या मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी आमच्या मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात येईल.

आर्थिक विषमता निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. ज्यांना हात-पाय आहेत, त्यांना महिन्याला पैसे देणार अन् दिव्यांगांना का नाही? ही तफावत दूर करण्यासाठी हा मोर्चा असेल. संभाजीनगर मोर्चामध्ये दीड लाख लोक सहभागी होणार आहेत. हा मोर्चा जाती धर्मासाठी नाही. माझा रोख कुठल्या योजनेकडेही नाही; पण व्याधी पाहून मदत करा. त्यांचे कष्ट मोजा इतकेच आमचे म्हणणे आहे,’’असे कडू यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.