ठाकरे सरकार कोसळताच बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट!

Bacchu Kadu
Bacchu Kadu esakal
Updated on

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी उशीरा रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकराणाला नवं वळण लागल आहे. एकिकडे सरकार कोसळत असताना बंडखोर आमदार बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली (bachchu kadu file closed clean chit in the road scam Maharashtra Politics) आहे.

Bacchu Kadu
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक

बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केला असल्याचं वंचित बहुजन आघाडीने उघडकीस आणलं होतं. या प्रकरणातून क्लीन चीट मिळाली आहे.

अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर होता. हे प्रकरण कोर्टात दाखल होतं. सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे.

Bacchu Kadu
'महाराष्ट्राची जनता जिंकली'; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अभिनेत्याचं ट्वीट

नेमकं काय आहे प्रकरण?

अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडूंनी कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिल्याने पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली आहे.

यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी ७ फेब्रुवारीला कारवाईच्या परवानगीच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यपालांच्या पत्रात यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीनं बच्चू कडू यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली.

Bacchu Kadu
हिंदुत्त्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ..; काय म्हणाले पाटील?

सोबतचं प्रथमश्रेणी न्यायालयाने कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात न्यायालयात अर्जही केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करून थेट सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसासर कडूंवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.