Video: दिव्यांगांसोबत धोका! बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या दिली कानशिलात; नेमकं काय घडलंय?

Bachu Kadu slapped officer: एखाद्या मुद्द्यावर चुकीच्या पद्धतीनं कार्यवाही झाल्यानंतर आमदार बच्चू कडू अनेकदा आक्रमक झाले आहेत.
Bachchu Kadu
Bachchu Kadu
Updated on

संभाजी नगर : एखाद्या मुद्द्यावर चुकीच्या पद्धतीनं कार्यवाही झाल्यानंतर आमदार बच्चू कडू अनेकदा आक्रमक झाले आहेत. यातूनच त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दिव्यांगांची फसवणूक केल्यामुळं त्यांनी अधिकाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली आहे, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

Bachchu Kadu
''घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव घ्या, सरकारी अधिकाऱ्यावर ईडीने टाकला दबाव''; FIR दाखल

नेमकं काय घडलं?

दिव्यांगाना निकृष्ट दर्जाच्या ई-रिक्षा वाटप केल्यानं चिडलेल्या बच्चू कडू यांनी या रिक्षांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीवर प्रचंड भडकले आणि त्यांनी थेट त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावून दिली.

Bachchu Kadu
Ladka Shetkari Yojana: "'लाडका शेतकरी' योजनाही सुरु करा"; शेतकऱ्यानं अजित पवारांसमोरच नेमकी काय केली मागणी?

ई-रिक्षांची अडचण काय?

दिव्यांग वित्त महामंडळाकडून मागील महिन्यात अतिशय निकृष्ट दर्जाच्या झालेल्या ई-रिक्षांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून करण्यात आला आहे. या ई-रिक्षाचे अपघात झाल्याचे तसेच बॅलन्सींगचा प्रोब्लेम आणि बॅटरी खराब असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. यासाठी दिव्यांग वित्त महामंडळाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीकडून संभाजीनगरमध्ये लाभार्थ्यांच्या रिक्षाची चाचणी घेण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.