नागपूर: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल ७८६ पदे रिक्त असून ७८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. तर दुसरीकडे अनेक शिक्षक हे प्रतिनियुक्तीवर इतरत्र आहेत. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्वच शिक्षकांना शाळेत वर्ग घेण्यासाठी जावे लागणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. बदली प्रक्रियेनंतर शिक्षण विभागाने शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त केल्याने सदस्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता.
प्रतिनियुक्तीवर इतरत्र असलेल्या शिक्षकांना शाळेत पाठविण्याची मागणी समीर उमप यांनी केली होती. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सर्वच प्रतिनियुक्तीच्या शिक्षकांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठवण्याचे निर्देश दिले होते.
स्थायी समितीच्या सभेतही हा मुद्दा चर्चेला आला होता. समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत तसेच इतर शिक्षकांना शैक्षणिक कार्याव्यतिरिक्त इतर कामे देण्यात येऊ नये, अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या होत्या.
त्यानंतर शिक्षण विभाग कामाला लागला. प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची माहिती तालुकास्तरावरून मागवून घेत त्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी रूजू करून घेण्यात येणार आहे.
तब्बल ७८६ पदे रिक्त
जिल्ह्यात शिक्षकांची तब्बल ७८६ पदे रिक्त आहेत. सर्वाधिक ११८ रिक्त पदे ही अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या रामटेकमध्ये आहेत.
त्याखालोखाल नरखेडमध्ये १११, मौद्यात ९७, कुहीत ६७, पारशिवनीत ६१, काटोलमध्ये ६४, हिंगण्यात ५८, उमरेड ५०, भिवापूर ३५, नागपूर (ग्रा.) ३९, कामठी २४, कळमेश्वर २० तर सावनेरमध्ये ४२ पदे रिक्त आहेत.
रिक्त पद व प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांचा मुद्दा सर्वसाधारण सभा व स्थायी समितीत चर्चेला आला. अध्यक्षांच्या निर्देशावरून प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांची माहिती गोळा करण्यात आली. १० ते १५ शिक्षक असल्याची माहिती आहे. ३० जूनपूर्वी या शिक्षकांना शाळा देण्यात येईल.
रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी प्राथमिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.