Sharad Pawar
Sharad Pawar ESakal

अक्षयला कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी व्हायला हवी होती; गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद, शरद पवारांची प्रतिक्रिया

Akshay Shinde Encounter: बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी महाराष्ट्र पोलिसांवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना गोत्यात उभे केले असून आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Published on

बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यावर शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बदलापूर प्रकरण कायद्याच्या कक्षेत सोडवायला हवे होते, असे शरद पवार म्हणाले. मात्र आरोपींच्या बदल्यात गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे, असं ते म्हणाले आहेत.

बदलापूरमधील दोन मुलींवर झालेल्या अन्यायाच्या प्रकरणाची कायद्याच्या कक्षेत चौकशी व्हायला हवी होती, असे ट्विट शरद पवार यांनी सोमवारी केले. भविष्यात अशा निंदनीय कृत्याचा कोणी विचारही करू नये म्हणून कायद्याचा धाक दाखवण्यात सरकार कमकुवत झाल्याचे दिसते. या घटनेची सखोल चौकशी केल्यास सत्य समोर येईल, अशी आशा आहे, असं शरद पवारांनी सांगितले आहे.

Sharad Pawar
गाडी मुंब्रा बायपासवर आली, तेव्हाच अक्षयने बंदूक खेचली अन्... अखेर पोलिसांनी घटनाक्रम सांगितला!

तर दुसरीकडे यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं होतं, त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे. ह्या घटनेचा वापर करुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची शक्यता आहे. ह्या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करु पाहणारेही दिसू लागतील... पण ह्या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि ह्या लपवालपवीचा काही संबंध आहे का? ह्याची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी!

तर अनिल देशमुख म्हणाले की, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.