Akshay Shinde Encounter: शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत मोठी अपडेट! सुप्रीम कोर्टाने सर्वच राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आदेश

Supreme Court: बचपन बचाओ आंदोलन या 'एनजीओ'ने ही याचिका दाखल केली आहे. सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने देशातील सर्वच राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश देत बचपन बचाव आंदोलनाबाबत दिलेला आदेश पाळावा, असं कोर्टाने म्हटलं आहे.
Supreme Court :
Supreme Court child pornsakal
Updated on

Badlapur School Crime: बदलापूरमध्ये दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला. एन्काऊंटरनंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याने आता सीआयडीकडून एन्काऊंटरचा तपास होणार आहे. या प्रकरणात न्यायालयीन पातळीवर आणखी एक घडामोड घडली आहे.

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठसमोर सुनावणी झाली.

बचपन बचाओ आंदोलन या 'एनजीओ'ने ही याचिका दाखल केली आहे. सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने देशातील सर्वच राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश देत बचपन बचाव आंदोलनाबाबत दिलेला आदेश पाळावा, असं कोर्टाने म्हटलं आहे.

Supreme Court :
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास CID करणार; आजच सूत्र हाती घेणार

'मुलांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी आहे, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.'' असं कोर्टाने आपल्या आदेशामध्ये म्हटलं आहे. हे आदेश सर्व राज्यांना लागू असणार आहेत. मुख्य सचिवांना याबाबत कोर्टाने सूचित केलेलं आहे.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे संजय शिंदे कोण आहेत?

संजय शिंदे हे बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, ज्यांचं नाव देशातील प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशलिस्टमध्ये घेतलं जातं. संजय शिंदे यांचा अनुभव आणि कार्यक्षमता यामुळे या प्रकरणात त्यांचे महत्त्व वाढलं आहे. वर्ष २०१४ मध्ये खूनाच्या आरोपी विजय पालांडेच्या फरार होण्याच्या घटनेनंतर संजय शिंदे यांचं निलंबन झालं होतं. परंतु ते पुन्हा सेवेत रुजू झाले. याशिवाय, त्यांनी इक्बाल कासकरला अटक करण्याचं धाडसाचं काम केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.