Devendra Fadnavis : अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला जामीन; पण...

Devendra Fadnavis amruta fadnavis and anil jaysinghani
Devendra Fadnavis amruta fadnavis and anil jaysinghani
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसूलीच्या प्रकरणात मुख्य आरोपी बुकी अनिल जयसिंघानीला सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या सशर्त जामिनावर न्यायलायकडून अनिल जयसिंघानीची सुटका करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis amruta fadnavis and anil jaysinghani
पंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक निर्णय! महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर

खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला आरोपीची हजेरी अनिवार्य असून साक्षीदारांना न धमकावण्याचे निर्देश न्यायालयाने जयसिंघानीला दिले आहे. जयसिंघानीची मुलगी आणि भाऊ या सहआरोपींना यापूर्वीच न्यायलायकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात यावर्षी 20 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता.

जयसिंघानी 15 गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी आहे. अमृता फडणवीस यांनी 20 फेब्रुवारी रोजी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा विरुद्ध ब्लॅकमेल, धमकावणे आणि एक रुपयाची ऑफर दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांच्या रडारवर जयासिंघानी आला होता. या प्रकरणात अनिक्षाला 16 मार्च रोजी अटक करून पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

Devendra Fadnavis amruta fadnavis and anil jaysinghani
Supriya Sule : संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना हुरहूर लागल्याची सुप्रिया सुळेंची भावना...

नोव्हेंबर 2021मध्ये ही डिझायनर अमृता फडणवीस यांना भेटली होती. यावेळी तिने तिच्या आईचं निधन झाल्यानंतर एकटीनेच घराचा सर्व भार उचलल्याचा दावा केला होता. या पहिल्या भेटीनंतर अनिक्षा ही नंतर अमृता फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जात असे. सागर बंगल्यावरही ती येत असे. या काळात तिने अमृता फडणवीस यांना काही कार्यक्रमात ड्रेस आणि ज्वेलरी परिधान करण्यासाठी दिली होती

यापूर्वी दोनदा अटक

जयसिंघानी याला ठाणे पोलिसांतील गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन उपायुक्त अमर जाधव यांनी 2004 मध्ये अटक केली होती. त्यावेळीही जाधव यांच्यावर आरोप केले होते. पुढे जाधव यांनीच 2009 मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागात उपायुक्त असतानाही त्याला अटक केली. त्यावेळीही जयसिंघानी याने जाधव यांच्यावर जोरदार आरोप केले. या प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त के एम प्रसन्ना यांनी रीतसर चौकशी केली. या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()