Bal Bharati : कवितेवरुन वातावरण पेटलं! दीपक केसरकरांनी समर्थन दिल्यानंतर साहित्यिकांचा संताप, म्हणाले...

Bal Bharati
Bal Bharatiesakal
Updated on

मुंबई: बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेसह त्यातील ‘वन्समोअर’ शब्दाचे समर्थन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. त्यावर आता राज्यातील साहित्यिक वर्तुळात पुन्हा टीकेचे सूर उमटले आहेत. मराठी भाषा विकास आणि शालेय शिक्षण मंत्री पद असलेले मंत्री एका सुमार दर्जाच्या कवितेचे समर्थन कसे करू शकतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

‘जंगलात ठरली मैफल’ पहिलीतील ही कविता अत्यंत सुमार आहे आणि ती पाठ्यपुस्तकात समाविष्ट कशी झाली, यावर साहित्यिकांनी आक्षेप घेतला. यात संपादक मंडळाच्या दोषाकडे मंत्र्यांनी लक्ष घालायला हवे होते; मात्र त्यांनी समर्थन केले. ही बाब योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. शिवाय मराठी भाषा विभाग आपल्याकडे आहे, म्हणून सर्व काही कळते, असेही नसल्याचे साहित्यिकांनी म्हटले आहे. दुसरीकडे कवयित्री पूर्वी भावे यांनी परत मराठी शिकायला हवी. पुस्तकात ही कविता छापण्यास ज्यांनी मंजुरी दिली, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे.

Bal Bharati
Ajit Pawar: "बेटा अजित कितना खाया..?"; वडेट्टीवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली तर मिटकरींचे शोले स्टाईल उत्तर

सुमारे २,५०० वर्षे जुन्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मागणाऱ्या मराठी भाषामंत्र्यांनी ‘वन्स मोअर’ला मराठी पर्याय काय, प्रॅक्टिकलला मराठीत काय म्हणायचे, असे जाहीररीत्या विचारू नये. मुद्दा केवळ पहिल्या वर्गापासून कोणत्या प्रकारच्या मराठीचा संस्कार आपल्या मुलांवर करायचा एवढाच मर्यादित आहे.

- श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ साहित्यिक

पूर्वी भावे यांची कविता अत्यंत दर्जाहीन आहे. मुळात त्या कवितेचेही निवड चुकीची होती. मराठीत जुने-नवे प्रतिभावंत बालकविता‍ लिहिणारे असंख्य कवी आहेत. त्यातही मंत्री अशा सुमारे दर्जाच्या कवितेचे समर्थन करत असतील, तर कपाळावर हात मारायची वेळ आल्याचे वाटते. अशा प्रकारची कविता मराठी संस्कृती, भाषेसाठी घातक आहे.

डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक

लहान मुलांसाठी पाठ्यपुस्तकात कविता निवडताना त्याचे निकष महत्त्वाचे आहेत. मराठीत अत्यंत चांगल्या बालकविता आहेत. त्या लहान मुलांसमोर याव्यात, इतकी अपेक्षा आहे.

- वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ साहित्यिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.