बाळासाहेबांनीही केली होती काँग्रेसशी मैत्री; 6 वर्षांच्या मैत्रीनंतर असे गेले होते भाजपसोबत

uDDHAV tHACKERA AND Aditya Thackeray Sonia Gandhi
uDDHAV tHACKERA AND Aditya Thackeray Sonia Gandhi
Updated on

मुंबई - बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची दोन दिवसीय बैठक संपली. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष देखील सहभागी झाला होता. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः बंगळुरूला पोहोचले.

uDDHAV tHACKERA AND Aditya Thackeray Sonia Gandhi
"मला माझ्या प्रियकराची भेट घडवा..."; महिलेचा टॉवरवर चढून हाय-व्होल्टेज ड्रामा

2019 मध्ये शिवसेनेने भाजपसोबतची मैत्री तोडली आणि त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. यानंतर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार कसे, असा मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला. पण भाजपशी मैत्री करण्यापूर्वी शिवसेनेने काँग्रेसशीही मैत्री केली होती, हे वास्तव आहे.

खरे तर शिवसेना सुरू झाली तेव्हा त्याला कम्युनिस्टचा विरोधी पक्ष म्हटले जायचे. शिवसेनेने पहिल्यांदाच ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली आणि पक्षाने 40 पैकी 17 जागा जिंकल्या. शिवसेनेची पहिली युती प्रजा सोशालिस्ट पार्टीशी होती, पण 1970 मध्ये युती तुटली.

uDDHAV tHACKERA AND Aditya Thackeray Sonia Gandhi
Ajit Pawar : अजित पवारांचा वाढदिवस 'अजित उत्सव' सप्ताह म्हणून होणार साजरा; तटकरेंची माहिती

त्यानंतर 1973 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यासाठी शिवसेनेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत युती केली. या निवडणुकीत शिवसेनेला 39 जागा मिळाल्या. त्यानंतर 1974 मध्ये मुंबई सेंट्रल जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक होणार होती. काँग्रेस पक्षाची लाट आली आणि शिवसेनेने त्यांना साथ दिली. सीपीआयच्या उमेदवाराकडून निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी काँग्रेस आणि शिवसेनेची मैत्री इथूनच सुरू झाली.

1977 मध्ये बीएमसीच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेसने मुरली देवरा यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली. या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंब्याची गरज होती. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसचे उमेदवार मुरली देवरा यांना पाठिंबा दिला. यानंतर 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आणीबाणीनंतर पहिल्यांदाच देशात निवडणुका होत होत्या. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला साथ दिली होती.

1978 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेनेने अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले. परंतु त्यावेळी एकही जागा जिंकता आली नव्हती.

शिवसेना आणि काँग्रेसची मैत्री 1980 पर्यंत कायम होती. शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली. 1980 मध्ये काँग्रेसनेही परतफेड केली. काँग्रेसने शिवसेनेच्या तीन नेत्यांना विधान परिषदेवर पाठवले. मात्र 1982 मध्ये मुंबईतील कापड गिरणी कामगारां केलेल्या संपानंतर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील दुरावा निर्माण झाला.

आपला जनाधार ढासळत चालल्याचे वाटल्याने शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा देणे बंद केले. येथून शिवसेना आणि भाजप जवळ येऊ लागले. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर युतीत झाले. अशाप्रकारे भाजप आणि शिवसेनेची एकत्र निवडणूक लढवण्यास सुरुवात झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.