फडणवीस- राज ठाकरेंमध्ये दोन तास बैठक; नांदगावकर म्हणाले...

मध्यल्या काळात भाजपला सत्ता स्थापनेसाठी जी काही मदत लागली आहे ती मनसेकडून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे.
Bala Nadgaonkar
Bala NadgaonkarSakal
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. या सर्वामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असून मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी माध्यमांसमोर येत या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले. (Bala Nandgaonkar News In Marathi)

Bala Nadgaonkar
केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीसांचा पोपट केलाय; राऊतांची टीका

नांदगावकर म्हणाले की, मी स्वतः, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि राज ठाकरे यांनी साधारण 15 ते 20 मिनिटे फडणवीसांसोबत चर्चा केली. त्यानंत आम्ही बाहेर पडलो. मात्र, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये साधारण एक ते सव्वा तास चर्चा झाली. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे कधीच कोणती गोष्ट लपवून ठेवत नाहीत. त्यामुळे जे काही असतं ते नंतर स्वतः बोलतात. त्यामुळे नेमकी दोघांमध्ये काय चर्चा झाली हे राज ठाकरेंच्या आधी फडणवीसांकडून कळू शकेल असे सूचक विधान नांदगावकारांनी केले आहे.

Bala Nadgaonkar
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच राज ठाकरेंच्या घरात औक्षण करून स्वागत

ही युतीची सुरुवात आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, फडणवीस आणि राज ठाकरेंची मैत्री पूर्वीपासूनची आहे. मध्यल्या काळात भाजपला सत्ता स्थापनेसाठी जी काही मदत लागली आहे ती मनसेकडून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. असे कण्यामागे राज्यात जी काही अस्थिरता होती ती स्थीर व्हावी यासाठी ही मदत होती. मदत करण्यामागे मौत्री ही एकच भूमिका होती. याचा अर्थ आमचा सरकारमध्ये समावेश असलाच पाहिजे असे म्हणणे चुकीचे आहे. तसेच आम्ही तशा प्रकारे मागणीदेखील केलेली नाही.

Bala Nadgaonkar
संसदेत आंदोलनावर बंदी नाही; शरद पवारांचं स्पष्टीकरण

राज ठाकरे आणि फडणवीस यापैकी कोणत्या नेत्यावर तुमचा अधिक विश्वास आहे असे विचारले असता ते म्हणाले की, राजकारणामध्ये सर्वांवर विश्वास ठेवणे गरजेचे असते. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप मनसे युती होऊ शकते का यावर त्यांनी आता बोलणे उचित ठरणार नाही असे विधान केले आहे. कारण अद्याप निवडणुकांबाबत ठोस काही नाही पुढे काय होणार याची माहिती नाही. त्यामुळे यावर आता बोलणं चुकीचं ठरले असे नांदगावकर म्हणाले. सध्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका आहेत आणि त्यात आम्ही कुणाला पाठिंबा देणार हे सर्वांनाच माहिती असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.