एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी केलं शंभूराज देसाईंचं अभिनंदन; असं नेमकं काय घडलं?

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis esakal
Updated on
Summary

राज्यात सध्या राजकीय घटनांनी वातावरण गढूळ होताना दिसत आहे.

Maharashtra Political Crisis : राज्यात सध्या राजकीय घटनांनी वातावरण गढूळ होताना दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांच्या कथित बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडलीय. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आता मैदानात उतरले असून बंडोखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

महाराष्ट्रातील या राजकीय पेचप्रसंगादरम्यान साताऱ्यातून एक महत्वाची बातमी समोर आलीय. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची (Balasaheb Desai Sugar Factory) निवडणूक यंदा बिनविरोध झालीय. ही निवडणूक बिनविरोध झाल्यानं सर्व संचालकांचं नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह गुवाहाटीत असलेल्या सर्वच आमदारांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचं अभिनंदन केलं.

Maharashtra Political Crisis
Satara : गद्दारांना माफ करणार नाही; बंडखोर आमदारांविरुध्द शिवसेना आक्रमक

साताऱ्यामधील पाटण (Satara) तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच लागली होती. राष्ट्रवादीचे नेते सत्यजीतसिंह पाटणकर (Satyajeetsinh Patankar) यांच्या गटानं पाटण तालुक्यात साखर कारखाना सुरु केल्यानं यंदा देसाई कारखान्याची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली, त्यामुळं यंदा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना निवडणूक बिनविरोध झाली. सध्या गुवाहाटीत असलेले आमदार शंभूराज देसाई यांनी कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती समाज माध्यमातून देत ही परिवर्तनाची नांदी असल्याचं म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()