Narayan Rane: राणेंचं भाषण...भुजबळांनी दाखवला हात अन्...विधानभवनात गोंधळ

नारायण राणेंनी नीलम गोऱ्हेंशी घातली हुज्जत
Narayan Rane Neelam Gorhe Chhagan Bhujbal
Narayan Rane Neelam Gorhe Chhagan Bhujbalesakal
Updated on

Narayan Rane News: बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम विधानभवनात पार पडला. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी केलेल्या भाषणामुळे विधानभवनात गोंधळ पाहायाला मिळाला.

त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Balasaheb Thackeray Tailchitra Inaugration Narayan Rane Neelam Gorhe Chhagan Bhujbal)

बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगत असताना नारायण राणे यांनी त्यांना मानसिक त्रास कुणी दिला, याबाबत बोलायला सुरूवात केली. नारायण राणे यांच्या या भाषणाला विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला.

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

नारायण राणेंचं भाषण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उठून सभागृहातून बाहेर निघाले. यावेळी राणेंनी त्यांना अडवलं, त्याचवेळी भुजबळांनी त्यांना हात दाखवला. यावर राणे म्हणाले कि, भुजबळांचं मला समर्थन आहे, म्हणूनच त्यांनी हात दाखवला.

नारायण राणेंच्या औचित्यभंग करणाऱ्या भाषणामुळे टीकेचा सूर उमटत असताना नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा सभापती नार्वेकर यांना भाषण थांबवायला सांगितलं. यावर “मी बसून बोलणाऱ्यांची ऐकत नसतो” असं राणेंनी उत्तर दिलं.

Narayan Rane Neelam Gorhe Chhagan Bhujbal
Raj Thackeray : भाजपला सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं होतं, पण...; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

यानंतर नीलम गोऱ्हे यांनी भाषण थांबवण्याचा इशारा केला. पण राणेंनी ‘मी नाही थांबणार’ असं म्हटलं. यावर नीलम गोऱ्हे यांनी राहुल नार्वेंकरांना हे काय चाललंय ? किती वेळ चालणार? असे सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राणे यांनी आपलं भाषण थांबवलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()