Sangli Vidhan Sabha: ''शिवसेनावाल्यांची माफी मागतो.. त्याशिवाय विशाल पाटील खासदार होऊच शकले नसते'', बाळासाहेब थोरातांचा सांगलीत खुलासा

Balasaheb Thorat on Vishal Patil: सांगली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी बाळासाहेब थोरातांनी लोकसभा निवडणुकीतील एका खुलासा केला. विशाल पाटील यांना काँग्रेसनेच मदत केली, त्यामुळेच ते खासदार होऊ शकले, असं थोरात म्हणाले.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat sakal
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. त्याचं कारण विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसची अडचण झाली होती. त्या निवडणुकीत विशाल पाटील निवडून आले. आता विधानसभेलाही सांगलीकडेच राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. पुन्हा एकदा वसंतदादा पाटील घराण्यातील सदस्याने अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.