Supriya Sule: राष्ट्रवादीचं ठरलं? महाराष्ट्रची पहिला महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे!

जयंत पाटील, अजित पवार यांच्यानंतर भावी मुख्यमंत्री पदासाठी आता सुप्रिया सुळे यांच्या नावाचे होर्डिंग्ज
Supriya Sule
Supriya SuleEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पोस्टर मुंबईतील राष्ट्रवादी ऑफिसच्या बाहेर लावलेले दिसून आले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा पोस्टरची चर्चा रंगली ती म्हणजे महाराष्ट्रची पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे! अशा आशयाच होर्डिंग्ज लागले आहेत.

NCP
NCP

राष्ट्रवादी कार्यालय बाहेर हे होर्डिंग्ज लागले असून राजकीय वर्तुळात या होर्डिंग्जची चर्चा रंगली आहे. या होर्डिंग्जवर महाराष्ट्रची पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे! असा उल्लेख आहे.

राष्ट्रवादीकडून होणाऱ्या बॅनरबाजीची सध्या सातत्याने चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटलांच्या बॅनरची चर्चा होती, तर परवा अजित पवारांमुळे चर्चा होत असतानाच आज सुप्रिया सुळे यांचे होर्डिंग्ज लागले आहेत.

Supriya Sule
Aditya Thackeray: एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, माहिती होतं...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसच्याबाहेर हे पोस्टर्स लागले आहेत. यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. "महाराष्ट्रची पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे!", असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. त्याचबरोबर अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असं निलेश लंके यांनी केलं होत.तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Supriya Sule
MPSC Student Protest : CM शिंदे दुसऱ्या कामात व्यस्त; शरद पवार, MPSC विद्यार्थ्यांसोबतची बैठक रद्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.