Baramati Lok Sabha Election 2024 : लेकीसाठी बाप मैदानात! काकडे, तावरे, थोपटेंच्या भेटीमागे शरद पवारांचं गणित काय?

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. म्हणजे पवारांची लेक विरुद्ध सून असा सामना असणार आहे.
Baramati Lok Sabha Election 2024 Sharad Pawar Meet Anantrao Thope Sambhajirao Kakade Chandrarao Taware
Baramati Lok Sabha Election 2024 Sharad Pawar Meet Anantrao Thope Sambhajirao Kakade Chandrarao Taware
Updated on

लोकसभा निवडणूक २०२४... ही खऱ्या अर्थानं अनेक कारणांमुळे वेगळी ठरतेय आणि ठरणार आहे. म्हणजे २०१४ साली मोदींची लाट, २०१९ ला हिंदुत्वाची लाट आणि आता २०२४ मध्ये राममंदिरासोबतच ओबीसी कार्ड समोर ठेवत ही निवडणूक लढवली जात आहे. अशातच आपल्या राज्यबाबत बोलायचं झालं, ऑपरेशन लोटस नंतर मागील २ वर्षात राज्यात फोडाफोडीचं बरंच राजकारण झालं आहे. राज्यातले दोन महत्वाचे पक्ष भाजपनं फोडलेत. म्हणजे तसं खुद्द भाजपच्या नेत्यांनीच वेळोवेळी अनेकदा प्रसार माध्यमांसमोर म्हटलंय. आता तुम्ही म्हणाल ही पवारांबद्दल बोलणार होती पण भाजपवर टीका करायला लागली. तर तसं नाही. सध्या लोकसभा निवडणुका लागल्यात. त्यामुळे पार्श्वभूमी समोर ठेवली आता येऊयात मूळ मुद्द्यावर... लेकीसाठी बाप मैदानात... काकडे, तावरे, थोपटेंच्या भेटीमागे पवारांचं गणित काय? हे आपण जाणून घेऊयात....

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. म्हणजे पवारांची लेक विरुद्ध सून असा सामना असणार आहे. त्यातच शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्षही प्रचारसभांमधून पाहायला मिळतोय. त्यातच पवारांची बारामती अशी ओळख असणाऱ्या मतदारसंघात यंदा पवार घरातीलच दोन व्यक्ती एकमेकांसमोर आल्यानं ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. अशातच ३ टर्म खासदार राहिलेल्या लेकीसाठी यंदा शरद पवार पुन्हा नव्या जोषात आणि उत्साहात मैदानात उतरल्याचं दिसतंय.

म्हणजे शरद पवार फक्त प्रचारसभाच घेत नाहीत. तर बारामतीत त्यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असणाऱ्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठीही घेताना दिसताहेत. त्यामुळे म्हणतात ना.. राजकारणात कुणीच कुणाचा जास्त काळ शत्रू वा मित्र नसतो... म्हणजे आपण आताच राज्यातलं राजकीय समीकरण पाहिलं तर ते लक्षात येईल.

Baramati Lok Sabha Election 2024 Sharad Pawar Meet Anantrao Thope Sambhajirao Kakade Chandrarao Taware
Nagpur Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचं नागपूरकडे दुर्लक्ष? संघभूमीकडे स्टार प्रचारकांची पाठ; रामटेकमध्ये एकही नेता फिरकला नाही

आणखी एक गोष्ट म्हणजे मृत्युंजय कादंबरीत एक वाक्य आहे.. राजकारण हे केवळ दंडाच्या बलावर आणि मनाच्या चांगुलपणावर चालत नसतं. ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं. त्यामुळे वयाच्या ८४ व्या वर्षीसुद्धा पवार आपले डावपेच व्यवस्थित आखत असल्याचं दिसतंय. तर वस्ताद कायम आपला एक डाव राखून असतो अन् तो वेळ आल्यावर दाखवतो असं म्हटलं जातं आणि याचंचं उदाहरण एकदा डॉ. अमोल कोल्हेंनी पवारांविषयी बोलतानाही दिलं होतं. त्यामुळे या ओळींना साजेशा घडामोडी सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात होताना दिसताहेत.

आता याची सुरुवात झाली ती अनंतराव थोपटेंपासून...

जवळपास २५ वर्षांनंतर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसह मार्च महिन्यात माजी आमदार अनंतराव थोपटे यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली होती. खरंतर पवारांआधी खुद्द सुनेत्रा पवारांनीही थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी थोपटेंची साथ सुनेत्रा पवारांना मिळणार अशी चर्चा होती. त्याला आठवडा उलटत नाही तोच शरद पवार लेकीसह थोपटेंना भेटले. त्यानंतर अपक्ष निवडणुकीची घोषणा केलेल्या शिंदे सेनेचे नेते विजय शिवतारेही थोपटेंच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांनीही पवारांवर गंभीर आरोप केले होते. तरी, राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या त्या म्हणजे पवार अनंतरावांच्या भेटीला गेल्यानं... कारण, २५ वर्ष एका मतदारसंघातले असूनही पवार-थोपटे यांची भेट झाली नव्हती आणि त्यांच्यात संघर्ष चर्चेत होता...

म्हणजे अनंतराव थोपटेंसोबत पवारांचा संघर्ष हा खूप जुना आहे. म्हणजे १९९९ साली पवार जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हापासून आहे. कारण, थोपटेंनी काँग्रेस अन् पंजाची साथ सोडली नाही. त्यामुळे पवारांनीही भोरमधल्या या अनंतराव थोपटे अन् त्यांच्या मुलांनाही कधी मोठं होऊ दिलं नाही अशी चर्चा कायम बारामतीतल्या स्थानिक राजकारणात झाली आहे. आणि मागे शिवतारे थोपटेंना भेटले त्यावेळी त्यांनीही ही सल उघड बोलून दाखवली होती.

Baramati Lok Sabha Election 2024 Sharad Pawar Meet Anantrao Thope Sambhajirao Kakade Chandrarao Taware
Lok Sabha Election 2024 : ''डायनासोर'प्रमाणे काँग्रेस नष्ट होत चालला आहे'', राजनाथ सिंह यांचा घणाघात; म्हणाले...

त्यानंतर पवारांचे कट्टर विरोधक अशी ओळख असणारं नाव म्हणजे संभाजीराव काकडे

शरद पवारांनी त्यांचे परंपरागत विरोधक अशी ओळख असलेले माजी खासदार कै. संभाजीराव काकडे, कै. बाबालाल काकडेंच्या कुटुंबियांची नुकतीच भेट घेतली. मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष असलेल्या शामराव काकडेंच्या निवासस्थानी ही भेट झाली. जवळपास ५ दशकांनी म्हणजे तब्बल ५५ वर्षांनी शरद पवार काकडे कुटुंबाला भेटल्यानं राजकीय वर्तुळात या भेटीनंही सर्वांनाच चकीत केलं. कारण, काकडे आणि पवारांचं वैर हे अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून आहे. म्हणजे पवारांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणूनही संभाजीराव काकडेंची ओळख आहे. त्यांनी पवारांची मतं पटत नसल्यानं अनेकदा पवारांविरुद्ध लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली पण तिथे त्यांना पराभवाचाच सामना करावा लागला. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून ते आमदारकी, खासदारकी पासून जिल्हा बँकेपर्यंत सगळीकडे काकडे आणि पवार कुटुंबात संघर्ष झाला आहे.

म्हणजे आता काकडे आणि पवार कुटुंबाबाबत सांगायचं तर हे दोन्ही कुटुंब एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते असं बोललं जातं. आणि पवार जेव्हा आता काकडेंच्या कुटुंबीयांना भेटले तेव्हा ५ दशकांहून अधिकचा काळ लोटला आहे. त्यामुळे त्यांच्यातला राजकीय संघर्षाचा विस्तव अजूनही पेटताच आहे की तो येत्या काळात शमणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Baramati Lok Sabha Election 2024 Sharad Pawar Meet Anantrao Thope Sambhajirao Kakade Chandrarao Taware
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन द्या; सिसोदियांची कोर्टात मागणी

पवारांची तिसरी विरोधकासोबतची भेट म्हणजे चंद्रराव तावरे...

चंद्रराव तावरे म्हणजे पवारांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख. काकडेंनंतर बारामतीतला पवारांचा मोठा विरोधक म्हणूनही चंद्रराव तावरेंची ख्याती आहे. भाजप नेते, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशी ओळख असणारे चंद्रकांत तावरे. एकेकाळी पवारांचे निष्ठावंत ते कट्टर विरोधक असा तावरेंचा प्रवास राहिला आहे. आता ते भाजपसाठी काम करतात. म्हणजे तावरे भाजपचे नेते जरी असले तरी ते एकेकाळी शरद पवारांचे जुने सहकारी राहिलेत. त्यामुळे आज तब्बल पंधरा वर्षांनी तावरे आणि पवारांनी बंद दाराआड पंधरा मिनिटं चर्चा केल्याची माहिती आहे.

तर तावरेंना पवारांसोबतच्या भेटीविषयी विचारलं असता ते म्हणाले, ‘ही कोणतीही राजकीय भेट नव्हती. सांगवीत पवारसाहेब इतर कामानिमित्ताने आले असता ते माझ्या घरी आले. एकमेकांच्या तब्येतीबाबत चर्चा झाली. कौटुंबिक विचारपूस झाली. यापेक्षा वेगळी चर्चा झाली नाही, असं तावरेंनी सांगितली. तरी, बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना मदत होण्याच्या दृष्टीने पवार-तावरे यांची भेट महत्वाची मानली जाते.

त्यामुळे खरंतर काकडे, तावरे आणि थोपटेंच्या भेटीगाठी घेऊन पवारांनी लेकीसाठी यंदा नमतं घेतलंय? की वेळप्रसंगी सावध खेळी खेळली हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.