बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे रत्नागिरीला येणार आहेत. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे. राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Barsu Refinery Raju Shetty banned Ratnagiri maharashtra politics )
राजू शेट्टी यांना आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र, तरीही आपण बारसूला जाणारच, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याबाबतची नोटीश रत्नागिरी पोलिसांनी रात्री उशिरा राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन बजावली. 31 मे अखेर राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदीची नोटीस जारी करण्यात आली आहे.
मात्र, राजू शेट्टी यांनी अशा नोटीशींना मी भीक घालत नसून ज्या ठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बारसू प्रकल्पास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जमीनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. तर याविरोधात शेतकऱ्यांनी विरोध केला असता शेतकऱ्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.